शहीद तौसिफ यांच्या आठवणीने पाटोदेकर गहिवरले..आठवडाभरात औरंगाबादला होणार होती बदली!

तौसिफ शेख यांची बदली औरंगाबादला बदली होणार होती.आठवडाभरात मी जवळच येणार असल्याचे तो सांगत होता, अशी माहिती गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले तोशिफ शेख यांचे मित्र आणि शेजारी श्रीहरी गीते, वाहेद शेख यांनी सांगितली.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 06:30 PM IST

शहीद तौसिफ यांच्या आठवणीने पाटोदेकर गहिवरले..आठवडाभरात औरंगाबादला होणार होती बदली!

बीड,  2 मे- तौसिफ शेख यांची बदली औरंगाबादला बदली होणार होती.आठवडाभरात मी जवळच येणार असल्याचे तो सांगत होता, अशी माहिती गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले तोशिफ शेख यांचे मित्र आणि शेजारी श्रीहरी गीते, वाहेद शेख यांनी सांगितली. महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरपाडा इथे नक्षलवादी हल्ल्यात तोशिफ शेख यांना वीरमरण आले. पाटोदा शहरावर दुःखाचा डोंगर कोसळायला आहे. अद्याप तौसिफ यांच्या आई-वडिलांना माहिती कळवलेली नाही. पण, शहरातील व शेजारी सर्वजण तौसिफ यांच्या आठवणीने गहिवरले आहे.

गडचिरोली हल्ल्याची धक्कादायक माहिती समोर, माओवाद्यांनी असा तयार केला होता 'प्लॅन'

अत्यंत गरीब परिस्थितीतून तोसिफ शेख हे 26 एप्रिल 2011 क्यूआरटीमध्ये भरती झाले होते. त्यांचे वडील आजही हॉटेलवर काम करतात, तर आई घरकाम करते. देशसेवेचे वेड असलेले तौसिफ यांचे महाविद्यालयीन शिक्षण पीव्हीपी महाविद्यालयात झाले आहे. पहाटे उठून व्यायाम करणे हा त्यांचा आवडता छंद होता, अशा आठवणी सांगिताना तौसिफ यांच्या मित्रांचे यावेळी डोळे पाणावले.

हे कमांडो झाले शहीद...

दयानंद सहारे, अग्रमन रहाते, सर्जेराव खाडे, किशोर बोबटे, संतोष चव्हाण, राजू गायकवाड, लक्ष्मण कोडप, साहुदास माडवी, नितिन घोरमारे, पुर्णा शाहदुग्गा, प्रमोद भोयर, तौसिक शेख, अमृत भदाडे, योगेश हलामी, भुपेश वोलाटे, सोमेश्वर सिंहनाथ (खासगी चालक, रा.कुरखेडा)

Loading...

'झाडाच्या आडोश्याला जेवण, दुसरा जवान देतो पहारा' जंगलातला एक दिवस C-60 कमांडोंसोबत!

या ठिकाणी झाला हल्ला...

महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीच नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात सी-60 चे 15 कमांडो शहीद झाले तसेच एक चालकाचा मृत्यू झाला. जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला करण्यात आला. कुरखेडा तालुक्यातील जांभूरपाडा गावाजवळ ही घटना घडली होती.

कुरखेडा तालुक्यात जांभूरपाडा गावाजवळ हा हल्ला झाला आहे. शहीद जवानांचे पार्थिव गडचिरोली पोलीस मुख्यालयात आणण्यात आले असून लवकरच कुटुंबीयाना सोपविण्यात येणार आहेत.

या हल्ल्यापूर्वी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दानापूरमध्ये माओवाद्यांनी तब्बल 30 वाहने जाळली होती. या घटनेत 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त अधिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. माओवाद्यांनी मंगळवारी (30 एप्रिल)रात्री 11 ते 3 वाजेच्या सुमारास हे जळीतकांड घडवून आणले आहे.

नक्षलवादी हल्ल्यातील शहीदांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील या दोन सुपुत्रांचा समावेश

पुराडा पोलीस स्थानकाअंतर्गत येत असलेल्या दादापूर येथून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते. या कामावरील ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर यासह 30 पेक्षा जास्त वाहने जाळण्यात आली आहेत. तसेच दादापूर येथील डांबर प्लांट,राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालयही माओवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले. माओवाद्यांनी केलेल्या या कृत्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याआधीही माओवाद्यांनी रस्ते तयार करणाऱ्या वाहनांना लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आगामी काळात अशी विकासकामे करताना माओवाद्यांकडून होणाऱ्या हिंसक प्रकारांना कसे रोखायचे, हे आव्हान प्रशासनासमोर आहे.


गडचिरोली हल्ल्याची धक्कादायक माहिती समोर, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 06:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...