News18 Lokmat

नाशिकमध्ये उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या की हत्या ?

या घटनेनंतर वणी पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांना अटक केली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2017 05:09 PM IST

नाशिकमध्ये उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या की हत्या ?

19 आॅगस्ट :  नाशिक जिल्ह्यातील उच्च शिक्षित विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी तिची हत्या केल्याचं माहेरच्याच म्हणणं आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांना अटक केली आहे.

तीन महिन्यांपूर्वी बीएससी ऍग्रीचं शिक्षण घेतलेल्या स्वाती खालकर हिचा विवाह दिंडोरी तालुक्यातील वरखेडा इथं राहणाऱ्या अमोल भुसाळ याच्याशी झाला होता. लग्नाला तीन महिने होत नाही तोच स्वातींने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

या घटनेनंतर स्वातीच्या माहेरच्यांनी स्वातीने आत्महत्या केली नसून सासरच्यांनी तिची हत्या केल्याचं म्हणत वणी रोड वर रस्ता रोको करून घटनेचा निषेध केला.

सासरच्यांनी तुला स्वयंपाक येत नाही तसंच माहेरून पैसे आण म्हणत तिला मारहाण करत असल्याचं स्वातीच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

स्वातीचे शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या पोटात विषाचे अंश सापडल्याने या घटनेबाबत उलट सुलट चर्चा होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 05:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...