मॅट्रीमोनिअल साईटवरून 5 महिलांशी लग्न करणारा लखोबा गजाआड, 60 लाखांना लुटलं

या भामट्याने एक दोन नव्हे तर तब्बल 5 वेळा लग्न केलंय. नुसती लग्न केली नाहीतर एका महिलेचा 40 लाखांचा फ्लॅट तर एका महिलेला 20 लाखांना लुटलंय

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2018 08:57 PM IST

मॅट्रीमोनिअल साईटवरून 5 महिलांशी लग्न करणारा लखोबा गजाआड, 60 लाखांना लुटलं

नागपूर, 24 आॅगस्ट : वेगवेगळी सोंगं घेऊन अनेक लग्न करणारा नाटकातला लखोबा लोखंडे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र नाटकातल्या लखोबा लोखंडेलाही लाजवेल असा खराखुऱ्या लखोबा लोखंडेंचा नागपुरात पर्दाफाश झालाय. या भामट्याने  एक दोन नव्हे तर तब्बल 5 वेळा लग्न केलंय. नुसती लग्न केली नाहीतर एका महिलेचा 40 लाखांचा फ्लॅट तर एका महिलेला 20 लाखांना लुटलंय. या लखोबा लोखंडेचं नाव आहे आकाश माणिकलाल अग्रवाल..

नागपूरच्या बेसा बेलतरोडी परिसरात मॅट्रीमोनिअल साईटवरून महिलांना भेटून एकापाठोपाठ एक असे पाच लग्न करणाऱ्या आकाश माणिकलाल अग्रवाल या लखोबा लोखंडेला अटक करण्यात आली आहे. अजय अग्रवाल, अजय कुंभार आणि अजय कुमार अशी नावे या आरोपीने धारण केली होती.

धक्कादायक म्हणजे हा आरोपी महिलांसोबत मैत्री करून त्यांना लग्नाच्या बंधनात अडकवायचा आणि नंतर त्यांची संपत्तीही लुटाचयचा. विधवा आणि घटस्फोटीत महिलांना 'सेकंड शादी डाॅट काॅम'च्या माध्यमातून आरोपी भेटायचा आणि आपल्या पत्नीचे निधन झाल्याने दुसरे लग्न करण्याचे सांगायचा. या प्रकरणात या आरोपीला आणखीही काही लोकांनी मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे.

आतापर्यंत अशाप्रकारे पाच लग्न केल्याची आरोपीने कबुली दिली असून आजच्या गुन्ह्यात एका महिलेला भेटायला आला असतांना महिलेने विनयंभंगाची तक्रार दाखल केल्याने हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणात नागपुरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी  आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.

या आरोपीने अनेक महिलांसोबत लग्न करून त्यांची संपत्ती अवैध पद्धतीने विकल्याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे. अशाच एका महिलेचा 40 लाखांचा फ्लॅट आरोपीने विकला तसंच एका महिलेची अशाच प्रकारे लग्न करून 20 लाखांनी फसवणूक केल्याच्या संदर्भात पोलीस तपास करताहेत.

PHOTOS : सनी लिओनने केरळसाठी खरंच 5 कोटींची मदत केली का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2018 08:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close