आबांच्या मुलीचं लग्न, पाणावलेले डोळे आणि ‘दादा’, ‘ताईं’ची धावपळ!

आबांच्याच ओढीनं अनेक कार्यकर्ते या लग्नाला आवर्जुन उपस्थित होते. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं ते अजित पवार आणि सुप्रिया ताईंनी. लग्नाच्या दोन तास आधीच अजित पवार लग्न मंडपात हजर झाले होते. तर सुप्रिया ताई अगत्यानं सर्व व्यवस्था बघत होत्या.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 1, 2018 08:49 PM IST

आबांच्या मुलीचं लग्न, पाणावलेले डोळे आणि ‘दादा’, ‘ताईं’ची धावपळ!

पुणे,ता.01 एप्रिल: राज्याचे लोकप्रिय गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांचा विवाह पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद याच्याशी सोमवारी पुण्यात झाला. यावेळी सगळ्यांना आठवण येत होती ती आबांची.

आबांच्याच ओढीनं अनेक कार्यकर्ते या लग्नाला आवर्जुन उपस्थित होते. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं ते अजित पवार आणि सुप्रिया ताईंनी. लग्नाच्या दोन तास आधीच अजित पवार लग्न मंडपात हजर झाले होते. अजित दादांनी आवर्जुन सगळं व्यवस्थित आहे की नाही याची खातरजमा केली आणि खुद्द वऱ्हाडी मंडळींच स्वागत करायला दारावर उभे झाले.

तर सुप्रिया ताईंनी लग्नाच्या आधी अक्षता वाटत सगळ्यांची विचारपूस केली. आर. आर. आबा यांच्या पत्नी सुमनताई या आबा गेल्यापासून कुंकू लावत नाहीत सुप्रिया ताईंनी आल्यावर सुमनताईंची गळाभेट घेतली आणि स्वतः सुमन पाटील यांना कपाळावर टिकली लावली त्यावेळी लगळ्यांचे डोळे पाणावले होते.

ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटीलही अगत्यानं सर्व व्यवस्था बघत होते. पायाला दुखापत झाल्यानं शरद पवारांना यांना लग्नाला येणं जमलं नाही, डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2018 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...