कर्जमाफीसाठी सरकार शेतकऱ्यांना जात का विचारतंय ? - राहुल गांधी

कर्जमाफीसाठी सरकार शेतकऱ्यांना जात का विचारतंय ? - राहुल गांधी

महाराष्ट्रात कर्जमाफीच्या मुद्यावरून सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप राहुल गांधीनी केलाय. '' या सरकारने कर्जमाफीची घोषणा करताना 35 हजार कोटींची केली पण प्रत्यक्षात दिले फक्त 5 हजार कोटी !, कर्जमाफीसाठी अर्ज भरून घेताना सरकार शेतकऱ्यांची जात का विचारतंय ? असा खडा सवालही राहुल गांधींनी उपस्थित केलाय.

  • Share this:

नांदेड, 8 सप्टेंबर : महाराष्ट्रात कर्जमाफीच्या मुद्यावरून सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप राहुल गांधीनी केलाय. '' या सरकारने कर्जमाफीची घोषणा करताना 35 हजार कोटींची केली पण प्रत्यक्षात दिले फक्त 5 हजार कोटी !, कर्जमाफीसाठी अर्ज भरून घेताना सरकार शेतकऱ्यांची जात का विचारतंय ? असा खडा सवालही राहुल गांधींनी उपस्थित केलाय. ते नांदेडमध्ये बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, ''मोदी सरकारने देशातल्या तरुणांची आणि शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली असून हे सरकार जिथे तिथे फक्त जातीपातींमध्ये भांडणं लावून भारतीय समाजात तेढ निर्माण करू पाहतंय. 2 कोटी रोजगारांची घोषणा करणाऱ्या मोदी सरकारने प्रत्यक्षात 2 लाखही रोजगार उपलब्ध करून दिलेले नाहीत. तसंच काही हजारांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे करणाऱ्या मोदी सरकारने गुजरातमध्ये रतन टाटांना 65 हजार कोटींची खिरापत वाटताना खरंच रांगेत उभा केलं होतं का ?'' असा गंभीर आरोप ही राहुल गांधीनी केलाय.

जीएसटी ही खरी तर काँग्रेसची देन असून देशात 15 टक्क्यांच्यावर टॅक्स असू नये, अशी काँग्रेसची भूमिका होती पण मोदी सरकारने तोच जीएसटी 18 ते 28 टक्क्यांवर नेऊन ठेवल्याचा घणाघात राहुल गांधींनी केलाय.

नांदेड मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उपाधध्य राहुल गांधी आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडच्या जाहीर सभेनंतर राहुल गांधी परभणीत मोठा शेतकरी मेळावा घेणार आहेत.

दरम्यान, राहुल गांधीच्या एक दिवसीय दौऱ्याला नारायण राणेंनी दांडी मारल्याने त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2017 01:11 PM IST

ताज्या बातम्या