S M L

ठाण्यात 'पोलिसांसाठी' मॅरेथॉन

पोलीस दलातील कामाच्या विचित्र वेळांमुळे कर्मचाऱ्यांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यातून विविध आजारांचा सामनाही त्यांना करावा लागतो. एकीकडे गुन्हेगारांच्या मागे धावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना स्वत:च्या सदृढ आरोग्यासाठी धावण्यास प्रवृत्त करण्याचा निर्णय पोलीस मॅरेथॉनच्या निमित्ताने घेण्यात आला आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 19, 2017 12:58 PM IST

ठाण्यात 'पोलिसांसाठी' मॅरेथॉन

ठाणे, 19 नोव्हेंबर: ठाण्यात पोलीसांचा फिटनेस जपावा म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आज मॅरेथॉन आज आयोजित करण्यात आलं आहे. या मॅरेथॉनमध्ये आज सकाळपासून शेकडो पोलीस अधिकारी सहभागी झाले आहेत.

बंदोबस्ताचा ताण, कामाच्या अनियमित वेळा, प्रसाधनगृहांची वानवा, ऊन-वारा-पाऊस आदींची तमा न बाळगता रस्त्यावरील शेकडो गाड्यांच्या धुरात उभे राहूव केले जाणारे 'वाहतुकीचे नियमन' आदींचा थेट परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे होणाऱ्या विविध आजारांपासून दोन हात करण्यासाठी 'फिटनेस' महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच ठाणे पोलिस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी 'ठाणे पोलिस मॅरेथॉन'चं आयोजन करण्यात आलं आहे.

पोलीस दलातील कामाच्या विचित्र वेळांमुळे कर्मचाऱ्यांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यातून विविध आजारांचा सामनाही त्यांना करावा लागतो. एकीकडे गुन्हेगारांच्या मागे धावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना स्वत:च्या सदृढ आरोग्यासाठी धावण्यास प्रवृत्त करण्याचा निर्णय पोलीस मॅरेथॉनच्या निमित्ताने घेण्यात आला आहे.

सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत सर्रास होणारे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आदी आजारांचा टक्का पोलिस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये वाढू लागला आहे.

त्यामुळे स्वतःच्या आरोग्याप्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी मॅरेथॉनचा नक्कीच उपयोग होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2017 12:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close