बिस्लेरीच्या बाटलीवर आता मराठीत लेबल; काँग्रेस-मनसेत श्रेयवादाची लढाई

बिस्लेरीच्या बाटलीवर आता मराठीत लेबल; काँग्रेस-मनसेत श्रेयवादाची लढाई

बिस्लेरीवर मराठीत लेबलं आली याचं श्रेय आता मनसेनं घेऊ नये असं वक्तव्य कांग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलं आहे. याचा निर्णय ऑगस्टमध्येच झाला होता, अशी टीकाही केलीय.

  • Share this:

23 नोव्हेंबर: बिस्लेरीच्या बाटलीवर आता मराठीतही लेबल लावायला सुरुवात झालीये.पण यावरून आता काँग्रेस मनसेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

बिस्लेरीवर मराठीत लेबलं आली याचं श्रेय आता मनसेनं घेऊ नये असं वक्तव्य कांग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलं आहे. याचा निर्णय ऑगस्टमध्येच झाला होता, अशी टीकाही केलीय. मनसे ही अर्ध्या हळकुंडानं पिवळी होणारी संघटना आहे. हा मनसेच्या मराठीचा आग्रह धरणाऱ्या आंदोलनाचा परिणाम नाहीये. आंध्र आणि तेलंगणामध्येही या आधीच स्थानिक भाषेत लेबल लावण्यात येत आहेतय असं काँग्रेसचं म्हणणं आहे. पण मनसेला हे म्हणणं मान्य नाही. मनसेने आता मराठी पाट्यांचे आंदोलनही हाती घेतले आहे.तसंच मध्यंतरी फेरीवाल्यांचे आंदोलनातही मनसे सक्रिय झाली होती.

त्यामुळे आता यावरून नवीन राजकारण पेटतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2017 09:50 AM IST

ताज्या बातम्या