S M L

मराठा आरक्षणासाठी आता रस्त्यावर नाही तर करणार 'चक्री उपोषण'

20 ऑगस्टपासून पुणे विभागीय कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू करण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2018 08:45 PM IST

मराठा आरक्षणासाठी आता रस्त्यावर नाही तर करणार 'चक्री उपोषण'

पुणे, 18 ऑगस्ट : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चानं पुन्हा नवा एल्गार पुकारलाय. रस्त्यावर आंदोलन न करण्याचा चंग बांधल्यानंतर आता मोर्चेकऱ्यांनी चक्री उपोषणाचा इशारा दिलाय. येत्या 20 ऑगस्टपासून पुणे विभागीय कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू करण्यात येणार आहे. आंदोलन शांततापूर्वक आणि कुणालाही वेठीस न धरता करण्यात येणार असल्याचं आंदोलकांनी कबूल केलंय. या आधी झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि तोडफोड झाली होती आणि त्यामुळे प्रमाणावर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण निश्चित कधी देणार हे लेखी स्वरुपात द्यावं, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता मराठा क्रांती मोर्चानं बेमुदत चक्री उपोषणाचा इशारा दिलाय. 20 ऑगस्टपासून पुणे विभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपोषण करण्यात येणार आहे. आंदोलन शांततामय आणि कोणाला वेठीस धरले जाणार नाही. हिंसेनं नाही तर शांततेनं चक्री उपोषण करण्यात येणार आहे. यासंदर्भात आचार संहिता जाहीर केल्याचं सांगण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण निश्चित कधी देणार हे लेखी स्वरुपात द्यावं अशी मागणी केली जाणार आहे.

त्याचबरोबर यापुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लवकरच औरंगाबादला बैठक होणार असल्याचं समन्वयक शांताराम कुंजीर यांनी म्हटलंय. मराठा समाजाला आरक्षण, आंदोलनात आत्महत्याग्रस्ताच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई, कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी, खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासह पंधरा मागण्यांसाठी चक्री उपोषण केलं जाणार आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि तरुणांच्या मागण्या आहेत. त्याचबरोबर आंदोलनात नुकसान झालेल्या बसचे दिवे आणि काचा बसवून दिल्याचं त्यांनी सांगितलंय.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2018 08:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close