S M L

प्रत्येक जातीला पोट असतं, पण पोटाला जात लावू नका - उद्धव ठाकरे

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन, त्यांच्याशी मराठा आरक्षणाच्य मुद्यावर चर्चा केली.

Updated On: Jul 30, 2018 04:29 PM IST

प्रत्येक जातीला पोट असतं, पण पोटाला जात लावू नका - उद्धव ठाकरे

मुंबई, 30 जुलै : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन, त्यांच्याशी मराठा आरक्षणाच्य मुद्यावर चर्चा केली. दुपारी १२ वाजता मातोश्री वर पार पडलेल्या या बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी शिवसेनेची भूमीका स्पष्ट केली. प्रत्येक जातीला पोट असतं, पण कोणाच्याही पोटाला जात लावू नका. ज्यांना मिळालयं त्यांच्या ताटातलं हिसकून न घेता, मराठा, धनगर आणि इतर जातीतल्या गोरगरीबांचं पोट कसं भरेल याकडे आता सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली. त्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. शिवसेनेची भूमीका मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यासाठी आज सायंकाळी ४ वाजता सेनेचे सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पत्रपरिषदेत विविध माध्यमांच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यापाठोपाठ धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही आता ऐरणीवर आला आहे. मराठा, धनगर समाजासर इतर ज्या समाजाला आरक्षणाची खरी गरज आहे, त्यांची एकदा काय ती शिफास राज्य सरकारने संसदेकडे पाठवावी. केंद्रत सु्द्धा भाजपचेच सरकार, कारणे वेगवेगळी असली तरी संसदेत विषय कसा मार्गि लावायचा त्यासाठी आम्ही प्रयत्न करु.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी इतरांच्या भूमीकेवर कोणतिही टिका-टिप्पणी न करता, मराठा समाज बांधवांनी कोणताही कायदा हातात न घेता, कुठलिही आक्रमक भूमीका न घेता, आत्महत्येचा मार्ग न अवलंबिता सर्वांनी एकत्र यावे असं आव्हान केलं. मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमीका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेचे सर्व आमदार आज सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्र्याना भेटणार असल्याचे उद्धव यांनी यावेळी सांगितले.

 

चाकणमध्ये मराठा आंदोलन हाताबाहेर, 25 पेक्षा जास्त गाड्या जाळल्या

Loading...
Loading...

 

हे लोकशाहीचं दुर्दैव आहे..

शांततेने मागितलेली कोणतीच गोष्ट मिळत नाही, पण रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारला जाग येत असेल तर हे लोकशाहीचं दुर्दैव असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. ते पुढे म्हणाले की, मला मराठी माणूस प्यारा आहे, त्यांच्यात आता मला भांडणे नको आहेत. ज्यांना मिळालं आहे त्यांच्या ताटातलं हिसकून दुसऱ्यांना द्या असे माझे म्हणणे नाही. पण, मुख्यमंत्र्यांनी आतातरी मनावर घ्यावं आणि विशेष अधिवेशन बोलवावे अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

बाळासाहेबांना अपेक्षीत असलेली भूमीका शिवसेनेने बदलली आहे का?

बाळासाहेबांना जातीच्या नव्हे, तर आर्थिक निकषांवर आधारीत आरक्षण व्यवस्था मान्य होती. आता शिवसेनेने ही भूमीका बदलली आहे का असा प्रश्न न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीने विचारताच उद्धव यांनी, निकष कोणतेही असुदेत, पण कोणत्याही समाजातील गोरगरीब उपाशी राहता कामा नये, वंचित राहता कामा नये अशी आमची भूमीका असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा..

तळेगाव चौकात आंदोलकांनी जाळल्या गाड्या, अनेक बसेस जळून खाक

खडसेंच्या आवाजातली ऑडिओ क्लिप VIRAL, भाजपातले वाद पुन्हा चव्हाट्यावर

आता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, 1 ऑगस्टपासून करणार आंदोलन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2018 03:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close