मराठा आरक्षणासाठी उपसमितीची स्थापना; चंद्रकांत पाटील समितीचे प्रमुख

ओबीसींप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण आणि स्कॉलरशीप सारख्या सोईसुविधा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने उपसमितीची स्थापना केलीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2017 03:18 PM IST

मराठा आरक्षणासाठी उपसमितीची स्थापना; चंद्रकांत पाटील समितीचे प्रमुख

मुंबई, 13 सप्टेंबर : ओबीसींप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण आणि स्कॉलरशीप सारख्या सोईसुविधा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने उपसमितीची स्थापना केलीय. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे प्रमुख असणार आहेत. भाजपकडून गिरीश महाजन, संभाजी पाटील-निलंगेकर, तर शिवसेनेकडून दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे हे या समितीचे सदस्य असणार आहेत.

गेल्या 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चा निघाला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपससमितीची स्थापना करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज उपसमितीची स्थापना करण्यात आलीय. ही उपसमिती मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करेल, तसंच आरक्षणासाठीही न्यायालयीन लढाई लढण्यासाठी योग्य ती मदत उपलब्ध करून देईल. तसंच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जाहीर करण्यात आलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2017 03:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...