S M L

मराठा आंदोलन : नदीत उडी घेतलेल्या आंदोलकाचा मृत्यू

आज दुपारी औरंगाबाद- अहमदनगर रोडवरील कायगाव इथं गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं

Updated On: Jul 23, 2018 05:38 PM IST

मराठा आंदोलन : नदीत उडी घेतलेल्या आंदोलकाचा मृत्यू

औरंगाबाद, 23 जुलै : औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज जलसमाधी आंदोलन केलं होतं. कायगाव टोका येथीस गोदावरी नदीकाठावर त्यांनी हे आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे नावाच्या तरुणाचा मृत्यू झालाय.

आज दुपारी औरंगाबाद- अहमदनगर रोडवरील कायगाव इथं गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्क जलसमाधी आंदोलन केलं आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरी नदीत अर्पण केली आहे. या वेळी अपघात घडला काकासाहेब शिंदे नावाच्या तरूणाने नदीतच उडी घेतली. प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो त्यात वाहून गेला. नंतर त्या तरूणाला शोधण्यात यश मिळालं.त्याला काही मच्छीमारांनी पात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.

मराठा मोर्चेकरांचं टोकाचं पाऊल, मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरीत सोडली

मराठा समाज आक्रमक

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाने अनेक शांतीपूर्ण मार्गाने मूक मोर्चे काढून मराठा आरक्षणासाठी सरकारकडे शांततेच्या मार्गाने आरक्षणाची मागणी केली होती. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करून मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार कडून होत असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.

Loading...

VIDEO : अन् मराठा मोर्चात अवतरले 'मुख्यमंत्री'

परभणीत जाळपोळ

तर दुसरीकडे परभणीतही मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पेटवलं आहे. गंगाखेडमध्ये 4 खासगी गाड्या, 5 बसेस, पोलिसांची व्हॅन आणि एक बस जाळण्यात आली आहे. या आंदोलनामुळे गंगाखेड परिसराला दंगलीचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे गंगाखेड बंदची हाक हिसंक वळणार नेण्यात आली असंच म्हणावं लागेल.

परभणीत मराठा कार्यकर्ते पेटले, पोलीस व्हॅनसह जाळल्या 6 बसेस

मराठा कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे 2 वार्ताहार जखमी झाले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आंदोलनात जखमी झालेल्यांना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर ठिकठिकाणी मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी राडा घातला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 05:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close