मराठा आरक्षण : युवकाच्या आत्महत्येनंतर परभणीत पुन्हा तणाव

मराठा आरक्षण : युवकाच्या आत्महत्येनंतर परभणीत पुन्हा तणाव

मराठा आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यातील डीग्रस वाडीत राहणाऱ्या अंनत लेवडे याने स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून, संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे.

  • Share this:

परभणी, 5 ऑगस्ट : सेलु तालुक्यातील डीग्रस वाडी गावात राहणाऱ्या अंनत लेवडे नामक युवकाने मराठा आरक्षणासाठी रविवारी फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या नावे पोस्ट टाकून स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर त्याचे नातेवाईक आणि मराठा समाजाच्या नागरीकांनी त्याचा मृतदेह सेलु पोलीस ठाण्यात आणलाय. त्याच्या नातेवाईकांनी  मुख्यमंत्र्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. तर, गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह न हलवण्याचा निर्धार त्यांनी केलाय. अंनतच्या आत्महत्येमुळे मराठा समाज आक्रमक झाला असून, संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना, रविवारी परभणी जिल्ह्यातील सेलु तालुक्यातल्या डीग्रस वाडीत राहणाऱ्या अंनत लेवडे या तरुणाने शेतात जाऊन स्वतःला पेटऊन घेतले. हे करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक पोस्ट टाकली. त्यात, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी आज स्वतःचे बलीदान देत आहे. मला आज खूप आनंद होत आहे की, मी आपल्या जातीसाठी काहीतरी करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आजवर माला देशासाठी काही करता आले नाही, पण मी मागासलेल्या माराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वतःचे बलीदान देत असल्याचे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अहमदनगर रोडवरील कायगाव इथं मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 23 जुलै रोजी दुपारी जलसमाधी आंदोलन केलं होतं. कायगाव टोका येथील गोदावरी पात्रावरील पुलावर त्यांनी हे आंदोलन केलं. पण हे आंदोलन सुरू असताना काकासाहेब शिंदे नावाच्या तरूणाने नदीतच उडी घेतली आणि नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आत्महत्यांचे सत्र सुरू झालयं.

त्यानंतर औरंगाबादच्या मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर प्रमोद होरे पाटील (28) या युवकाने मराठा आरक्षणासाठी रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली. प्रमोदनेसुद्धा आत्महत्या करण्याआधी फेसबुकवर 'मराठा आरक्षण जीव जाणार' अशा कॅप्शन सह त्याचा रेल्वे ट्रॅकवरील फोटो पोस्ट केला होता. प्रमोदची ही पोस्ट वाचल्यानंतर त्याच्या मित्रमंडळींनी त्याला शोधण्यासाठी सुरूवात केली आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी प्रमोदचा मृतदेह मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाबाहेर सापडला.

त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली गावात राहणाऱ्या तृष्णा तानाजी माने (वय १९) या तरुणीने मराठा आरक्षणासाठी विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. राज्यात मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी झालेल्या आंदोलनांत ती सहभागी झाली होती.

यापूर्वीही पेटलं होतं परभणी, पोलिसांना करावा लागला होता हवेत गोळीबार

परभणी जिल्ह्यात २८ जुलै रोजी मराठा आंदोलन पेटलं होतं. आणि पोलिस-व्हॅन फोडणाऱ्या आंदोलकांना पांगविण्यासाठी अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांकडून ठिकठिकाणी चक्का जाम करण्यात आला होता. त्यामुळे परभणीत आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. आंदोलनकर्त्यांनी ग्रामीण पोलिसांच्या गाडीवर हल्ला करून पोलिस-व्हॅनची तोडफोड केली होती. यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले होते. आणि हे सर्व करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला होता. एकंदर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे २८ जुलै रोजी परभणी जिल्ह्यात सर्वत्र तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सेलु येथील युवकाच्या आत्महत्येनंतर आज परत परभणीत तणाव निर्माण झालाय.

हेही वाचा..

मराठा आरक्षण द्या अन्यथा अनर्थ अटळ, उदयनराजेंचा इशारा

मराठा आंदोलनात परप्रांतीयांकडून हिंसाचार,राज ठाकरेंचा आरोप

Friendship Day : मैत्रीतूनच भेटतात त्यांना 'नातवंडं'

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2018 07:37 PM IST

ताज्या बातम्या