S M L

मराठा आरक्षण : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार

परभणी जिल्ह्यात मराठा आंदोलन पेटलं असून, पोलिस-व्हॅन फोडणाऱ्या आंदोलकांना पांगविण्यासाठी अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला.

Updated On: Jul 28, 2018 07:57 PM IST

मराठा आरक्षण : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार

परभणी, ता. 28 जुलै : परभणी जिल्ह्यात मराठा आंदोलन पेटलं असून, पोलिस-व्हॅन फोडणाऱ्या आंदोलकांना पांगविण्यासाठी अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला. जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांकडून ठिकठिकाणी चक्का जाम करण्यात आलाय. त्यामुळे परभणीत आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आंदोलनकर्त्यांनी ग्रामीण पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला आणि पोलीसांच्या गाडीची तोडफोड केली. यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय.

परभणी जिल्ह्यात सलग 5 व्या दिवशी मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम असून, मराठा आंदोलकांकडून पुकारण्यात आलेलं चक्का जाम आंदोलन चांगलंच पेटलंय. शहरात 5 तर जिल्ह्यात 11 पेक्षा जास्त ठिकाणी चक्का जाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने शहरासह जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प झालीय. परभणी शहरातील वसमत मार्गावर आणि टाकळी येथे आंदोलनकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करून ग्रामीण पोलिसांची गाडी फोडली. या घटनेत 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी संतापलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावी लागला. एकुणचं जिल्ह्यात सर्वत्र तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, आंदोलकांनी पुन्हा सायंकाळीसुद्धा रस्त्यावर उतरुन परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावर वाहनांवर तुफान दगडफेक केली. यात आंदोलकांनी 5 ते 6 ट्रकची तोडफोड केली असून, पोलीस व आंदोलकांमध्ये धुमश्चक्री सरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...

नांदेडमध्ये आंदोलकांनी रुग्णवाहिका पेटवली

Loading...

मराठा आरक्षणासाठी पेटलेली आग अजूनही विझलेली नाही. नांदेडमध्ये सुद्धा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, आंदोलनकर्त्यांनी थेट रुग्णवाहिकाच पेटवून दिल्याचा प्रकार घडलाय. नांदेड-देगाव रोडवर ही रुग्णवाहिका कार्यकर्त्यांनी पेटवून दिली. रुग्णाला नांदेडला सोडून परत जाणारी रुग्णवाहिका अडवून आंदोलकांनी ती जाळली आणि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.

सोलापूरमध्ये अंगावर रॉकेल ओतून घेतलं पेटवून

सोलापूरात मराठा आरक्षणासाठी एक गंभीर प्रकार घडला आहे. सोलापूरच्या माढ्यात मराठा आंदोलकाने रॉकेल अंगावर ओतून घेऊन पेटवुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. माढा शहरात रास्तारोको सुरू असतानाच त्याने अंगावर ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तानाजी नरसिंह पाटील असे या आंदोलकर्त्याचे नाव आहे. माढा तालुक्यातील माढा-वैराग मार्ग हा आज सकाळी पुन्हा एकदा आंदोलकांनी रोखून घरला होता. माढा तालुक्यातील दारफळ गावच्या तरुणांनी पहाटे 5 वाजल्यापासुन चक्का जाम आंदोलनाला सुरूवात केली होती. जाळपोळ करत आंदोलकांनी रस्तारोको केला आहे. रस्त्यावर टायर टाळून आणि झाडांच्या फांदा टाकत त्यांनी आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. या तीव्र आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...

मराठा समाजाला आताचे आरक्षण कायम ठेवून आरक्षण देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच राज्य मागास आयोगाने मराठा समाजाबद्दलचा अहवाल शक्य ते लवकर दिला तर त्यानंतर लगेच विशेष अधिवेशन बोलावणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील किरकोळ गुन्हे मागे घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.

 

हेही वाचा...

मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांनी मराठा आंदोलनात तेल ओतलं - शरद 

Bus Accident Update : ट्रेकर्सच्या मदतीने मृतांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू

दापोली ते आंबेनळी घाट - 'त्या' चार तासांत काय घडलं ?

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2018 07:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close