मराठा आरक्षणाचा ATR उद्या मांडणार, भाजपच्या मदतीला राष्ट्रवादी धावणार?

'आयोगाचा अहवाल हा सरकारसाठी फार फायद्याचा नसल्याने तो मांडण्यास सरकार टाळाटाळ करत असावं.'

News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2018 08:03 PM IST

मराठा आरक्षणाचा ATR उद्या मांडणार, भाजपच्या मदतीला राष्ट्रवादी धावणार?

मुंबई, 27 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासंदर्भातला कृती अहवाल म्हणजेच ATR बुधवारी सरकार विधानसभेत मांडणार आहे. मात्र ATR न मांडता पूर्ण अहवालच सभागृहात मांडावा अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली असून विरोधपक्ष त्यावर अडून आहे. काँग्रेस हा अहवालावरच अडून आहे तर राष्ट्रवादी ATR मांडण्यासाठी तयार होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळं पुन्हा एकदा राष्ट्रवादी भाजपच्या मदतीला धावणार का हे बुधवारी विधिमंडळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान सर्वच पक्ष आमदारांसाठी व्हीप काढणार असून आमदारांना पूर्णवेळ सभागृहात बसण्याचा आदेश देण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाचा एटीआर की अहवाल या दोन शब्दांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण सध्या सुरू आहे. 29 नोव्हेंबरला मराठा आरक्षणासंदर्भात मांडल्या जाणाऱ्या विधेयकाआधी सरकार एटीआर मांडणार आहे. मात्र विरोधक एटीआर नव्हे तर मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. याच मुद्दयावरून मंगळवारी दोन्ही सभागृहात घमासान पाहायला मिळालं.

ATR म्हणजे काय?


  • ATR म्हणजे अॅक्शन टेकन रिपोर्ट

  • एखाद्या अहवालासंदर्भात सरकारनं केलेली कृती म्हणजे ATR

  • मराठा आरक्षणासंदर्भात सरकार ATR सादर करणार

  • ATR मध्ये आयोगाच्या अहवालातल्या शिफारशींचा समावेश नाही


आयोगाचा अहवाल हा सरकारसाठी फार फायद्याचा नसल्याने तो मांडण्यास सरकार टाळाटाळ करत असावं असं मत राज्याचे माजी महाअधिवक्ते आणि मराठा आरक्षणासाठी दाखल याचिकाकर्त्यांचे वकील श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलं. सरकारला अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो गोपनिय राहत नाही. त्यावर सर्व आमदारांचा अधिकार आहे असंही ते म्हणाले. या प्रश्नावर सरकार शिवसेनेलाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहे.


 


 


 


 

VIDEO : मराठा आणि मुस्लीम आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीस ‘UNCUT’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 08:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close