मराठा आरक्षण: अॅड गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण करणारी व्यक्ती कोण आहे?

मराठा आरक्षण: अॅड गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण करणारी व्यक्ती कोण आहे?

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणाऱ्या वैद्यनाथ पाटील यांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणाही दिल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कोर्ट परिसरात काही वेळापूर्वी हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव वैद्यनाथ पाटील असं आहे. वैद्यनाथ पाटील हे जालना जिल्हातील रहिवासी असल्याची माहिती त्यांनी स्वत:च दिली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणाऱ्या वैद्यनाथ पाटील यांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणाही दिल्या आहेत. हल्ला करणाऱ्या वैद्यनाथ पाटील यांचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे की ते कोणत्या संघटनेशी ते जोडले गेले आहेत, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

हल्ला करताना वैद्यनाथ पाटील यांच्यासोबत इतरही काही तरूण होते. पण गुणवर्ते यांना एकट्या वैद्यनाथ पाटील यांनी मारहाण केली आहे. वैद्यनाथ पाटील यांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला केल्यानंतर इतर वकिलांनी वैद्यनाथ पाटील यांनाही मारहाण केली आहे.

कोण आहेत अॅड गुणरत्न सदावर्ते?

मराठा आरक्षण कायद्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका करण्याच्या तयारीत असलेले अॅड. गुणरतन सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांना अनेक अज्ञात व्यक्तींकडून धमक्यांचे फोन येत आहेत. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रारही नोंदवली आहे.

Loading...

सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने केला. पण या कायद्याला अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील हे उद्या याचिकेद्वारे हायकोर्टात आव्हान दिलं आहे. यामुळे आता त्यांना निनावी धमक्यांचे फोन येत आहेत. माता रमाबाई आंबेडकर नगर आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, असं सदावर्ते यांनी सांगितलं. तक्रारीनंतर घराजवळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असं सदावर्ते म्हणाले.


VIDEO: निकालानंतर ईव्हीएम वादात, अनिल गोटेंची पहिली प्रतिक्रिया


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 02:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...