आता आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर आंदोलनं : मराठा संघटनांचा एल्गार

आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येईल असा निर्णय लातुरच्या बैठकीत मराठा संघटनांनी घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2018 06:22 PM IST

आता आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर आंदोलनं : मराठा संघटनांचा एल्गार

लातूर, ता. 29 जुलै :आरक्षणासाठी राज्यभर सुरू झालेलं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा संघटनांनी दिलाय. लातुरात आज राज्यस्तरीय मराठा समाजाची बैठक पार पडली. यापुढे आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येईल असा निर्णय लातुरच्या बैठकीत घेण्यात आला. तसंच 9 ऑगस्टपासून मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील मराठा आंदोलकांनी दिलाय. यापुढे सरकारशी कसलीच चर्चा करणार नाही हे देखील लातुरच्या बैठकीनंतर समन्वयकांकडून स्पष्ट करण्यात आलंय त्यामुळं मराठा आरक्षणाचं आंदोलन सरकारला जड जाण्याची शक्यता आहे. लातूरमध्ये झालेल्या बैठकीत राज्यातल्या आंदोलनात सक्रीय असलेल्या विविध संघटनांनी सहभाग घेतला होता.

मराठा आरक्षण : कशी राहील शिवसेनेची भूमीका? पक्षप्रमुखांनी बोलवली बैठक

एका महिन्यात मागास आयोगाचा अहवाल येईल- देवेंद्र फडणवीस

महिनाभरात मागासवर्गिय आयोगाचा अहवाल

आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, नारायण राणे यांच्या उपस्थित मराठा आंदोलकांमध्ये बोलावलेली बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या संघटना चर्चा करायला तयार झाल्या त्यांच्याशी आम्ही चर्चा केली असून, अजून कोणी संघटना चर्चेसाठी येणार असेल तर आमची त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे. तसेच सरकारने मागास आयोगास लवकरात लवकर अहवाल देण्याची विनंती केली असून, अहवाल आला की एका महिन्यात अधिवेश केले जाईल. त्यामुळे सकल मराठा समाजाने राज्यात शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Loading...

एकदा तरी 'आषाढी वारी' अनुभवावी : पंतप्रधानांचं 'मन की बात' मध्ये आवाहन

गणपतीच्या सजावटीत 'इकोफ्रेंडली' साहित्य वापरा - पंतप्रधानांचं मंडळांना आवाहन

मराठा आंदोलनादरम्यान, तरुणांवर दाखल करण्यात आलेले ३०७ सह सर्व प्रकारचे गुन्हे मागे घेण्यात येतील. मात्र, पोलिसांवरील हल्ले आणि जाळपोळींसारखे गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचे ते म्हणाले. जे व्हिडीओंमध्ये या सर्व गोष्टी करताना दिसत आहेत त्यांच्यावरील गु्न्हे कुठल्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2018 06:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...