मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापणार, मराठा महामोर्चा 'इफेक्ट'

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापणार, मराठा महामोर्चा 'इफेक्ट'

मराठा महामोर्चाचं भगवं वादळ मुंबईत धडकताच सरकार खडबडून जागं झालंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 9 ऑगस्ट : मराठा महामोर्चाचं भगवं वादळ मुंबईत धडकताच सरकार खडबडून जागं झालंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात येणार आहे. या समितीला कॅबिनेटचा दर्जा असल्याने समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेचीही गरज राहणार नाहीये. मराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल राज्य मागास आयोगाला सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादाही घालून देण्यात येणार आहे.

या मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयासोबतच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सहा लाखाच्या ईबीसी सवलत मिळण्यासाठीची गुणांची अट ही 60 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर आणण्यात येणार आहे. तसंच प्रत्येत जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारच्यावतीने वसतिगृह उभारण्यात येणार आहेत. यासोबतच सारथी संस्थेचे नव्याने सक्षमीकरण करण्याचाही निर्णय सरकार घेणार आहे.

58वा मराठा महामोर्चा राज्याची राजधानी मुंबईत धडकल्यानंतरच सरकारला खऱ्याअर्थाने जाग आल्याचं दिसतंय. दरम्यान, मराठा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला असून पाच मुलींनी आंदोलकांच्या मागण्यांचं निवेदन वाचून दाखवलंय. त्यानंतर हेच निवेदन सरकारला सादर केलं जाईल. मराठा आरक्षणासाठीचा हा शेवटचा महामोर्चा असून यापुढे मोर्चे नाहीतर आंदोलनं करू, असं आयोजकांनी यापूर्वीच जाहीर केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2017 12:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...