मराठा समाजाचे आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी गुरूवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत हा निर्णय मराठा समाजाच्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2017 10:51 AM IST

मराठा समाजाचे आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, 2 ऑगस्ट: मराठा समाजाचा क्रांती मोर्चा मुंबईत 9 ऑगस्टला काढण्यात येणार आहे.पण त्याआधी मराठा समाजाचे आमदार आणि मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी गुरूवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत हा निर्णय मराठा समाजाच्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. बैठकीला नारायण राणे, सहकार मंत्री सुभाष देशमुख,आशिष शेलार,विनायक मेटे,सतेज पाटील, भरत गोगावले, लक्ष्मण जगताप यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. या बैठकीत विधिमंडळात मोर्चाबाबत आणि मराठा समाजाचे प्रश्न मांडणे, सर्वपक्षीय मराठा आमदारांची समन्वय समिती स्थापन करणे या आणि अशा अनेक मुद्दयांवर चर्चा करण्यात आली. यानंतर या सर्व मुद्दयांवर मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसंच मराठा समाजाची स्थिती, आरक्षणासाठी कायदेशीर प्रयत्न आणि क्रांती मोर्चाची तयारी यावरही चर्चा करण्यात आली. दरम्यान भाजपने त्यांच्या सगळ्या नेत्यांना या मोर्चात सामील व्हायची मुभा दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2017 10:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...