S M L

मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांनी मराठा आंदोलनात तेल ओतलं - शरद पवार

मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या विधानांमुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चिघळलं.

Updated On: Jul 28, 2018 06:11 PM IST

मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांनी मराठा आंदोलनात तेल ओतलं - शरद पवार

कोल्हापूर, 28 जुलै : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या अस्थिरतेचं वातावरण आहे. आघाडी सरकार असताना आम्ही आरक्षणाचा निर्णय घेतला असता पण आचारसंहितामुळे आम्हाला मर्यादा आल्या. असं शरद पवारांनी म्हटलं आहे. आज जे सत्तेवर आहेत, त्यांनी पूर्वी काही आश्वासन दिली होती त्याचं काय झालं असं विचारत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे अभिवचन सरकारनी दिलं. त्यामुळे सरकार काहीतरी करेल अस वाटत होतं. पण मुख्यमंत्री आणि सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण होत नाहीत म्हटल्यावर,तरुणाई आक्रमक झाली आणि आंदोलनाची ठिणगी पडली असं म्हणत शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

आज आरक्षणाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या विधानांमुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चिघळलं. त्यांच्या वक्तव्यांमुळे आगीत तेल टाकलं. त्यामुळे सगळा महाराष्ट्र पेटून उठला. पण कायदेशीर अडचणी असल्या तरी त्याला पर्याय आहेत. केंद्रातही त्यांची सत्ता आहे. त्यामुळे घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आरक्षण मागण्या पूर्ण करणं शक्य आहे. यासाठी राज्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्याला विरोधकांच सहकार्य हवं असेल तर मी जबाबदारी घेईन. राजकारण न आणता, प्रश्न सुटावा म्हणून मी सगळ्यांशी चर्चा करेण अस शरद पवार म्हणाले आहेत.



VIDEO : सोलापूरात मराठा आंदोलन पेटलं, टायर जाळून केला चक्का जाम

आर्थिक निकषांवर आरक्षण मिळणं हे चुकीच नाही. त्यामुळे शिवनसेना आणि भाजप एकत्र काम करतात. अशात सेना सूचना करत असेल तर त्यांनी गांभीर्याने विचार करावा असं म्हणत पवारांनी शिवसेनेवरही टीका केली आहे. तर मी चौदा निवडणुका लढलो आहे पण चंद्रकांत पाटील यांना अजून निवडणूका लढायच्या आहेत, त्यांना अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

PHOTOS : एकीकडे दगडफेक,तोडफोड तर दुसरीकडे वर्दीतली आई !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2018 11:14 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close