S M L

चाकणच्या हिंसक आंदोलनात झालं 8 कोटी रुपयांचं नुकसान!

दिवसभरात चाकमध्ये ज्यांनी ही तोडफोड केली ते स्थानिक आंदोलक नव्हतेच असा दावा केला जातोय

Updated On: Jul 31, 2018 02:01 PM IST

चाकणच्या हिंसक आंदोलनात झालं 8 कोटी रुपयांचं नुकसान!

पुणे, ३१ जुलैः पुण्याजवळील चाकणमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि राज्यात कुठे नाही तेवढा विध्वंस पाहायला मिळाला. चाकणमध्ये कालपासून चाललेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केलेल्या तोडफोडी आणि जाळपोळीत खासगी आणि सरकारी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काल केलेल्या जाळपोळीत सरकारचं सुमारे ८ कोटींचं नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात ३ हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आजही चाकणमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. दरम्यान कालच्या जाळपोळ आणि तोडफोडीमध्ये किती नुकसान झाल याचा आज पंचनामा केला जाईल. तसेच चाकण शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ आणि  बसस्थानकां येथील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केल्यानंतर,  संशयित दंगलखोरांना ताब्यात घेण्यासाठी पथकं नेमली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पुण्यात शिवाजीनगर बस स्थानकावरून नाशिककडे जाणाऱ्या बसेस काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. चाकणला झालेल्या घटनेनंतर पुढचा आढावा घेऊन बस सोडण्यात येत आहेत. या सर्व प्रकरणात प्रवाशांचे मात्र यामुळे हाल होत असून अनेकांना इच्छित स्थळी जाता येत नाहीये. दादर, बोरिवली आणि औरंगाबाद बसेस सोडण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक आंदोलन करण्यात येत आहे. काल चाकणमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. तब्बल १०० ते १५० गाड्या आंदोलकांनी फोडल्या. चाकणजवळच्या तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलंय. संध्याकाळी चाकण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलीये.

दिवसभरात चाकमध्ये ज्यांनी ही तोडफोड केली ते स्थानिक आंदोलक नव्हतेच असा दावा केला जातोय. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांची न्यूज १८ लोकमतने प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनीही या आंदोलनात हिंसा करणारे हे बाहेरचे होते असं आयोजकांकडून माहिती मिळतेय असं सांगितलं.

हेही वाचा-

PHOTOS : डॅशिंग नांगरे पाटील मराठा आंदोलनात, कुठे शेकहँड तर कुठे सेल्फी!

चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; जमावबंदी लागू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2018 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close