S M L

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे खरे की स्टंटबाजी ? हे आहे सत्य

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी राज्यातल्या आमदारांनी राजीनामा नाट्य सुरू केल्याची टीका होतेय.

Updated On: Jul 27, 2018 09:58 AM IST

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे खरे की स्टंटबाजी ? हे आहे सत्य

मुंबई, 27 जुलै : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी राज्यातल्या आमदारांनी राजीनामा नाट्य सुरू केल्याची टीका होतेय. कारण आतापर्यंत 6 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. मात्र प्रत्यक्षात औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवलाय. तर इतर पाच आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पोहोचलाच नसल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे मराठा आरक्षणाचं अशा पद्धतीने राजकारण होतय का अशी टीकाही आता सगळ्यांकडून करण्यात येत आहे.

आरक्षणाच्या हालचालींना वेग, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची रात्री उशीरा बैठक

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर आणि रमेश कदम भाजपच्या सीमा हिरे आणि राहुल आहेर, तसंच काँग्रेसचे भारत भालके यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय. त्यानुसार राजीनामा देण्यासाठी आमदारांनी स्वतः विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवणं अपेक्षित असतं. मात्र हर्षवर्धन जाधव सोडून आणखी कोणत्याही आमदारांनी ते धाडस दाखवलेलं नाही. त्यामुळे आरक्षणासाठी राजीनामा देणं हे निव्वळ नाटक आहे असंच म्हणावं लागेल.

नवी मुंबईत बंददरम्यान जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

हर्षवर्धन जाधव सोडले तर अद्याप एकाही आमदाराचा राजीनामा आला नाही अशी माहिती विधानसभा अध्यक्ष कार्यालय येथून मिळाली आहे. विशेष म्हणजे ना कोणात्या आमदारांनी ईमेल अथवा फॅक्सवर राजीनामा केला नाही असे ही अध्सक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आरक्षणासाठी आपलं पद पणाला लावून राजीनामे देणं हे खरं आहे की आमदारांची स्टंटबाजी ?

Loading...
Loading...

हेही वाचा...

गुवाहाटीत आढळला 'उलट्या' काळजाचा माणूस, डाॅक्टरही हैराण

VIDEO : त्याने साप पकडला अन् सापाने त्याचा 'हात' !

VIDEO : शिवराज सिंह पायरी चुकले,स्टेजवरून कोसळले

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 09:58 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close