मराठा समाजाच्या आंदोलनात असामाजिक तत्वं, शिवसेनेचा लोकसभेत प्रहार

मराठा समाजाच्या या मागण्यांचा मुद्दा लोकसभेतही गाजला.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2018 02:34 PM IST

मराठा समाजाच्या आंदोलनात असामाजिक तत्वं, शिवसेनेचा लोकसभेत प्रहार

दिल्ली, 24 जुलै : सध्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मराठा मोर्चाला आता हिंसक वळण लागलं आहे. मराठा समाजाच्या या मागण्यांचा मुद्दा लोकसभेतही गाजला. शिवसेनेने लोकसभेत शून्य प्रहरात मराठा आंदोलन प्रश्न मांडला. मराठा समाजाच्या आंदोलनात काही असामाजिक तत्व घुसलेत, त्यांना आवरण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत असा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

कोल्हापुरात मराठा कार्यकर्त्यांकडून बेमुदत ठिय्या आंदोलन, 7 एसटी बस फोडल्या

मराठा, धनगर, लिंगायत सर्वच समाज आंदोलनांना थातूर-मातूर उत्तर दिल्याने राज्यात परिस्थिती चिघळली आहे असं म्हणत त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांचा विचार न करता न्यायालयाची ढाल पुढे केले जातेय असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान मराठा आंदोलनात काही समाज कंटक घुसलेत त्यामुळे मराठा आंदोलन बदनाम करत असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलंय. आरक्षण देणं हे सरकारच्या हातात नाही. आरक्षणाचा निर्णय हा न्यायालयातच होणार आहे. आंदोलनं करून बसेस जाळून आरक्षण मिळणार नाही. त्यामुळं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन चंद्रकांत दादांनी केलंय.

हेही वाचा...

Loading...

पुन्हा एका मराठा कार्यकर्त्याने नदीत टाकली उडी, गंभीर जखमी

मराठा कार्यकर्ते चिडले, काकासाहेब शिंदेंच्या अंत्यसंस्कारावेळी खैरेंना केली शिवीगाळ, धक्काबुक्की

VIDEO : मराठा कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत खैरेंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2018 02:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...