S M L

कोल्हापुरात मराठा कार्यकर्त्यांकडून बेमुदत ठिय्या आंदोलन, 7 एसटी बस फोडल्या

दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा आणि सांगली तिन्ही जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झालाय.

Updated On: Jul 24, 2018 12:55 PM IST

कोल्हापुरात मराठा कार्यकर्त्यांकडून बेमुदत ठिय्या आंदोलन, 7 एसटी बस फोडल्या

कोल्हापूर, 24 जुलै : मूक मोर्चानंतर आपल्या मागण्यांसाठी पेटून उठलेल्या मराठा क्रांती मोर्चाने आता रौद्र रुप धारण केलं आहे म्हणलं तर आता वावगं ठरणार नाही. कारण आता जागोजागी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकरित्या आंदोलनाला सुरूवात केली आहे. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा आणि सांगली तिन्ही जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झालाय. कोल्हापूरमध्ये आजपासून मराठा समाजाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

आजच्या बंदमधून हे तिन्ही जिल्हे वगळण्यात आले होते पण अनेक ठिकाणी बंद सदृश्य परिस्थिती पाहायला मिळतेय. कोल्हापूर शहरातली अनेक दुकानं व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद केली असून एसटीची सेवा ही तुरळक प्रमाणामध्ये सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सात एसटी गाड्यांवर दगडफेक करण्यात आलीय तर सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यातही अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आले आहेत.

पुन्हा एका मराठा कार्यकर्त्याने नदीत टाकली उडी, गंभीर जखमी

VIDEO : मराठा कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत खैरेंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की

आतापर्यंत मराठा मोर्चा आंदोलनाकडे सर्वात शिस्तबद्ध आंदोलन म्हणून पाहिले जात होतं. मात्र आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती मूक मोर्च्यात ‘एक मराठा लाख मराठा’ अशी साद घालत रस्त्यावर उतरला होता. मराठवाड्यात सकल मराठा मोर्चाच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनात सोमवारी काकासाहेब शिंदे (वय २८) या तरुणाने गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे पुलावरील गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. त्यामुळे गंगापूर तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. काकासाहेब शिंदेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

हेही वाचा...

Video: चार मुलांनी मिळून अल्पवयीन मुलीची काढली छेड, मोबाईलवर शूट केले चित्रण

मराठा मोर्चातील काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर

मराठा मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2018 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close