29 जुलैला मराठा समाजाची बैठक, आंदोलनाबाबत घेऊ शकतात मोठा निर्णय

सकल मराठा समाजाची 29 जुलैला राज्यस्तरीय बैठक लातूर येथे पार पडणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2018 12:25 PM IST

29 जुलैला मराठा समाजाची बैठक, आंदोलनाबाबत घेऊ शकतात मोठा निर्णय

मुंबई, 27 जुलै : सकल मराठा समाजाची 29 जुलैला राज्यस्तरीय बैठक लातूर येथे पार पडणार आहे. यात मराठा समाज मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाला आहे. त्यामुळे आता पेटून उठत 29 तारखेला मोठ्या आंदोलनाबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 58 मुक मोर्चानंतर चिघळलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटताना दिसले. जागोजागी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. यात मालमत्तेचं नुकसान तर झालंच पण यात काहींनी आपला जीवही गमावला. पण तरीही सरकार काहीच निर्णय घेत नसल्यानं आता हे आंदोलन आणखी चिघळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे खरे की स्टंटबाजी ? हे आहे सत्य

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत गेल्या चार दिवसांपासून मराठा ठोक आंदोलनाचा राज्यभरात वनवा पेटला आहे. त्यामुळे आरक्षणासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्री आणि मराठा आमदारांची एक बैठक बोलावली होती. मराठा आरक्षण संदर्भात भाजपाची ही बैठक शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या 'सेवासदन ' या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार रवींद्र चव्हाण, गृहमंत्री रणजीत पाटील, बबनराव लोणीकर, भाजपचे आमदार आशिष शेलार आणि अन्य मंत्री उपस्थित होते. तर त्यानंतर फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी यांची आणखी एक बैठक रात्री उशिरा 1 वाजता संपली. त्यातही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

आरक्षणाच्या हालचालींना वेग, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची रात्री उशीरा बैठक

या बैठकीत आरक्षण देण्याबद्दल चर्चा करण्यात आली आहे. यात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. इतकी वर्ष खोळंबलेल्या या विषयावर अखेर आता भाजप तोडगा काढणार आहे, असं भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. हा मुद्दा न्यायालयात आहेत. खरंतर मागच्या सरकारमुळे मराठा आरक्षण खोळंबल्याची टीकाही दानवे यांनी केली आहे. तर मराठा आरक्षणासाठी चाललेल्या या आंदोलनावर मुख्यमंत्री सर्व पक्षांची शनिवारी बैठक घेणार आहे. यासाठी काल सगळ्यांना निमंत्रणही पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर आम्ही लवकरच तोडगा काढू असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Loading...

नवी मुंबईत बंददरम्यान जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 12:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...