Maharashtra Bandh: 'मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देण्याने काय साध्य होतं?' व्यंकय्या नायडूंचा सवाल

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील सर्व घटकांना बोलवावे आणि त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2018 04:05 PM IST

Maharashtra Bandh: 'मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देण्याने काय साध्य होतं?' व्यंकय्या नायडूंचा सवाल

नवी दिल्ली, २४ जुलैः मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही उपस्थित झाला. यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्यसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्यावर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी मात्र भोसले यांना खडे बोल सुनावले. आपलं मत व्यक्त करताना नायडू म्हणाल की, ‘मराठा आरक्षणाची मागणी मी समजू शकतो, मात्र मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणं चुकीचं आहे. यातून समाजाला काय संदेश जातो याचा विचार करणं गरजेचं आहे.’

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले मत मांडताना संभाजीराजे भोसले म्हणाले की, ‘शाहू महाराजांनी भारतात पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. यात मराठा समाजालाही स्थान होते. मात्र स्वातंत्र्यानंतर आरक्षणातून मराठा समाजाला वगळ्यात आले. गेल्या वर्षी अनेक मूक मोर्चे निघाले. या मोर्च्यांची दखल संपूर्ण भारताने घेतली. आता मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील सर्व घटकांना  बोलवावे आणि त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा.’ संभाजीराजे भोसलेंच्या मतावर, ‘मराठा आरक्षणासाठी आंदोलन समजलं, पण मुख्यमंत्र्यांना विठ्ठल मंदिरात न जाऊ देणं, यातून कोणता संदेश लोकांपर्यंत जातो याचाही विचार करावा,’ अशी मार्मिक प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्रात सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन दिवसेंदिवस हिंसक होत चाललं आहे. औरंगाबादमध्ये शाम पाटगावकर या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शाम हे कायगाव टोक येथे बंदोबस्ताला होते. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याच ठिकाणी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती. जमावाकडून दगडफेक होत असताना धावपळीत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबादमध्ये आज एसटी वाहतूक सकाळपासून बंद आहे. तसेच आंदोलनामुळे आतापर्यंत सुमारे ९० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद असून मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त आंदोलकांकडून अग्निशमन दलाच्या गाडीची जाळपोळ करण्यात आली आहे.

हेही वाचाः

पुन्हा एका मराठा कार्यकर्त्याने नदीत टाकली उडी, गंभीर जखमी

Loading...

मराठा कार्यकर्ते चिडले, काकासाहेब शिंदेंच्या अंत्यसंस्कारावेळी खैरेंना केली शिवीगाळ, धक्काबुक्की

VIDEO : मराठा कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत खैरेंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2018 04:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...