परभणी, 23 जुलै : आरक्षणासाठी पेटलेल्या मराठा क्रांती मोर्चाने आता आक्रमक वळण घेण्यास सुरूवात केली आहे. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गंगाखेडमध्ये आंदोलन चिघळवलं आहे. यात 4 खासगी गाड्या, 5 बसेस, पोलिसांची व्हॅन आणि एक बस जाळण्यात आली आहे. या आंदोलनामुळे गंगाखेड परिसराला दंगलीचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे गंगाखेड बंदची हाक हिसंक वळणार नेण्यात आली असंच म्हणावं लागेल.
मराठा कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे 2 वार्ताहार जखमी झाले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आंदोलनात जखमी झालेल्यांना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर ठिकठिकाणी मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी राडा घातला आहे.
VIDEO : अन् मराठा मोर्चात अवतरले 'मुख्यमंत्री'
दरम्यान, ठाण्यात अजब पद्धतीने आंदोलन केलं. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मराठा आरक्षणासाठी आज विठोबाला साकडे घालत ठाण्यात मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या वेशात आलेल्या आंदोलकाला घेराव करत विठुरायाचे दर्शन घेऊन दिले नाही अशा प्रकारचे पथनाट्य मराठा आंदोलकांनी सादर केले. आणि आपली मागणी मान्य करा अशा घोषणा दिल्या. गेली ४ दिवस ठाण्यातील कोर्ट नाका चौकात मराठा आंदोलक ठिया आंदोलन करतायेत.
हेही वाचा...
आषाढी एकादशीनिमित्त बिग बींनी केलं पांडुरंगाला अभिवादन
'तेल गेलं तूप गेलं...' कटरने कापलं एटीएम आणि...!
'गाईला वाचवा पण बाई असुरक्षित याची मला लाज वाटते'
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा