खासदार साहेब, माझ्यावरचा गुन्हा मागे घ्या नाहीतर मी जीव देईन

अमरावतीत मराठा आरक्षणासाठी एका तरूणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2018 12:19 PM IST

खासदार साहेब, माझ्यावरचा गुन्हा मागे घ्या नाहीतर मी जीव देईन

संजय शेंडे, प्रतिनिधी

अमरावती, 07 ऑगस्ट : अमरावतीत मराठा आरक्षणासाठी एका तरूणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. निलेश भेंडे हा मराठा कार्यकर्ता खा. अडसूळ यांनी अट्रोसिटी दाखल केल्याने BSNL टॉवर वर चढला आहे. अट्रोसिटी मागे घेण्याची मागणी युवकाकडून करण्यात आली आहे. त्यासाठी त्याने खासदारांनाच अलटिमेटम दिला आहे. माझ्यावरचा गुन्हा मागे घेतला नाही तर मी जीव देईन आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही खासदारांची राहिल असं मराठा मोर्चाच्या निलेश भेंडे या कार्यकर्त्याने म्हटलं आहे.

डोक्यावरून गेला ऑईल टँकर, तरुणाचा जागीच मृत्यू

माय बाप सरकार आरक्षण देईना ,अमरावती जिल्ह्याचे खासदार आम्हाला जगू देईना अशी चिट्ठी लिहत आज मराठा समाजाचा निलेश भेंडे हा तरुण अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शहरातील BSNLच्या टॉवरवर सकाळी साडे नऊच्या सुमारास चढला आहे. या सगळ्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

Loading...

दरम्यान, त्याला वाचवण्यासाठी आणि असं कृत्य करण्यापासूव परावृत्त करण्य़ासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवानगी युवकाला वाचवण्यासाठीदाखल झाले आहेत. घटनास्थळी असलेले नागरिक, पोलीस या तरुणाला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सावधान ! मुंबईतील चायनीज गाड्यांवरील चिकन रोगटलेल्या, मेलेल्या कोंबड्यांचं

अमरावती जिल्ह्याचे खासदार यांनी आमदार रवी राणा सह या तरुणावर अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल केला आहे. आरक्षणाच्या  मागणीसाठी नव्हे तर गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी हा तरुण टॉवरवर चढला आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत माझ्यावरचा गुन्हा मागे घ्या नाहीतर मी आत्महत्या करेन असं या तरूणाने म्हटलं आहे. माझ्या मृत्यूची संपूर्ण जबाबदारी ही खासदारांची असणार आहे असं म्हणत या तरूणाने टॉवरवरून चिठ्ठी खाली फेकून सांगितलं आहे.

त्यामुळे आता पोलीस या तरूणाला सुखरूप खाली उतरवतात का, की त्यासाठी त्याच्यावरचा गुन्हा रद्द करावा लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

अबू सालेमला करायचंय लग्न, कोर्टाकडे पॅरोलसाठी घेतली धाव

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2018 12:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...