मराठा मोर्चाचं भगव वादळ पुन्हा मुंबईकडे, परळीत ठिय्या आंदोलन

मराठा क्रांती मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेन सरकण्यास सुरुवात झालीय. मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो समर्थकांनी बुधवारी परळी तहसील कार्यालासमोर ठिय्या आंदोलन केले.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2018 03:37 PM IST

मराठा मोर्चाचं भगव वादळ पुन्हा मुंबईकडे, परळीत ठिय्या आंदोलन

मुंबई, ता. १८ जुलै - मराठा क्रांती मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेन सरकण्यास सुरुवात झालीय. मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो समर्थकांनी बुधवारी परळी तहसील कार्यालासमोर ठिय्या आंदोलन केले. मराठा आरक्षण जाहिर केल्यानंतरच नौकरभरती सुरु करावी अशी मागणी या आंदोलकांनी केलीय. परळीतल्या सुरु असलेल्या या आंदोलनामुळे मराठा मोर्चाचं भगव वादळ परत मुंबईच्या दिशेने सरकतेय की काय अशी शक्यता र्निमाण झाली आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाऊल ठेऊ देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत एकमुखी  हा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर मुख्यमंत्र्यांना महापूजाही करू देणार नाही असाही निर्णय मराठा मोर्चाकडून घेण्यात आला आहे.

...तर मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात पाय ठेऊ देणार नाही !

 

दिड तासापासून परळी येथे सुरु अललेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो समर्थकांनी जोपर्यत आम्हाला कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथुन उठणार नाही असा पवित्रा घेतलाय. तर, या आंदोलनाच्या अनुषंगाने मतांसाठी मराठा समाजाला फसविल्या जात असल्याची जळजळीत प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली आहे.

हेही वाचा...

छगन भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस निरीक्षक निलंबित

अजब मनपाचा गजब दावा, प्लास्टिक बंदीमुळे मुंबईत कमी पाणी तुंबलं

भाजपविरोधात आंदोलनामुळे मनसे कार्यकर्त्यांना थर्ड डिग्री, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 03:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close