मराठा कार्यकर्ते चिडले, काकासाहेब शिंदेंच्या अंत्यसंस्कारावेळी खैरेंना शिवीगाळ, धक्काबुक्की

मुक मोर्चातून आक्रमक झालेल्या मराठा मोर्चात काल औरंगाबाद इथं मराठा जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2018 02:57 PM IST

मराठा कार्यकर्ते चिडले, काकासाहेब शिंदेंच्या अंत्यसंस्कारावेळी खैरेंना शिवीगाळ, धक्काबुक्की

औरंगाबाद, 24 जुलै : मुक मोर्चातून आक्रमक झालेल्या मराठा मोर्चात काल औरंगाबाद इथं मराठा जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर कायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. अंत्यसंस्कारच्या ठिकाणावरून खैरे यांना पिटाळण्यात आलं.

कार्यकर्त्यांचा रोष पाहता चंद्रकांत खैरे यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला पण कार्यकर्त्यांवनी त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली आणि तिथून पिटाळून लावलं. या सगळ्या प्रकारामुळे मराठा क्रांती मोर्चा आता आपल्या मागण्यांसाठी आणखीनच आक्रमक होत चालला आहे असं म्हणायला हरकत नाही.

VIDEO : लोअर परळ फ्लायओव्हर बंद, प्रवाशांची 'तोबा' गर्दी

VIDEO : अरे तो बुडतोय,पण काकासाहेबाला वाचावला कुणीच आलं नाही !

काल दुपारी औरंगाबाद-अहमदनगर रोडवरील कायगाव इथं गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्क जलसमाधी आंदोलन केलं. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरी नदीत अर्पण केली आहे. या वेळी अपघात घडला काकासाहेब शिंदे नावाच्या तरूणाने नदीतच उडी घेतली. प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो त्यात वाहून गेला. नंतर त्या तरूणाला शोधण्यात यश मिळालं.त्याला काही मच्छीमारांनी पात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामीणरुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.

Loading...

काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीनं दिलीय. पण दरम्यान, काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणी तहसिलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांना पाठवलं सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

हेही वाचा...

बापरे!,आॅनलाईन केली सापाची आॅर्डर, बाॅक्स उघडला अन्...

मराठा मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक

मराठा मोर्चातील काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2018 11:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...