आज दिवसभर विधिमंडळात फक्त मराठा आरक्षणावर चर्चा

आज राज्य सरकार स्वत:च मराठा आरक्षण विधीमंडळात मांडणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2017 09:58 AM IST

आज दिवसभर विधिमंडळात फक्त मराठा आरक्षणावर चर्चा

मंगेश चिवटे, प्रतिनिधी

मुंबई, 8 ऑगस्ट: 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही महत्वाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आज राज्य सरकार स्वत:च मराठा आरक्षण विधिमंडळात मांडणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

आजचा विधिमंडळातील सर्व कामकाजाचा क्रम सरकारकडून अचानक बदलण्यात आला आहे. राज्य सरकार स्वतःहून कलम 293 अंतर्गत मराठा आरक्षण मांडणार आहे. तसंच समाजाच्या अन्य मागण्यांवर चर्चेचा प्रस्ताव ही आणण्यात येणार आहे. मराठा आमदार आशिष शेलार किंवा अन्य मराठा आमदार चर्चेचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने इतर सर्व मागण्यांवर विधिमंडळात अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकारी मंत्र्यांसोबत चर्चा करून हा मोठा निर्णय घेतला आहे. मराठा मोर्चाची दाहकता कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2017 12:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...