News18 Lokmat

मराठा मोर्चातील काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर

मुक मोर्चातून आक्रमक झालेल्या मराठा मोर्चात काल औरंगाबाद इथं मराठा आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा मृत्यू झाला.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2018 08:58 AM IST

मराठा मोर्चातील काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर

औरंगाबाद, 24 जुलै : मुक मोर्चातून आक्रमक झालेल्या मराठा मोर्चात काल औरंगाबाद इथं मराठा आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीनं दिलीय. पण दरम्यान, काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणी तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांना पाठवलं सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

VIDEO : अरे तो बुडतोय,पण काकासाहेबाला वाचावला कुणीच आलं नाही !

काल दुपारी औरंगाबाद-अहमदनगर रोडवरील कायगाव इथं गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्क जलसमाधी आंदोलन केलं. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरी नदीत अर्पण केली आहे. या वेळी अपघात घडला काकासाहेब शिंदे नावाच्या तरूणाने नदीतच उडी घेतली. प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो त्यात वाहून गेला. नंतर त्या तरूणाला शोधण्यात यश मिळालं.त्याला काही मच्छीमारांनी पात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या बंद आज मुंबईत होणार नाही. बंद आणि मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी सखल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज मुंबईत बैठक बोलावण्यात आले आहे . दुपारी दोन वाजता दादर च्या  शिवाजी मंदिर येथे ही बैठक बोलावण्यात आले आहे, सर्व मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा...

Loading...

मराठा आंदोलन : नदीत उडी घेतलेल्या आंदोलकाचा मृत्यू

मराठा मोर्चाकडून 'ही' शहरं वगळता आज महाराष्ट्र बंदची हाक

मुख्यमंत्री फडणवीसांनी 'या' गुन्ह्यातून बिल्डरांची केली सुटका

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2018 08:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...