S M L

माओवाद्यांकडून अक्षय कुमार आणि सायना नेहवालला तंबी

Samruddha Bhambure | Updated On: May 29, 2017 04:05 PM IST

माओवाद्यांकडून अक्षय कुमार आणि सायना नेहवालला तंबी

29 मे : सुकमामध्ये माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना अर्थिक मदत देणाऱ्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यावर माओवाद्यांनी टीका केली आहे. माओवाद्यांनी त्यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करणारं पत्रक काढून या पुढे कुठल्याही अभिनेता, खेळाडू आणि सेलिब्रिचीजनी जवानांच्या कुटुंबीयांना मदत न करण्याची तंबी दिली आहे.

तसंच, सुरक्षा दलाच्या जवानांनी आदीवासी महीलांवर अन्याय केल्याचा माओवाद्यांनी आरोप केला आहे.

मार्च महिन्यात सुकमा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले होते. गेल्या काही वर्षांमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या मोठ्या हल्ल्यांपैकी एक असल्याचं बोलल जातंय. या हल्ल्यानंतर अक्षय कुमार याने शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 9 लाख रूपये तर सायना नेहवाल हिने प्रत्येक कुटुंबाला 50 हजार याप्रमाणे सहा लाख रूपयांची अर्थिक मदत देऊन केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2017 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close