ग्राऊंड रिपोर्ट : माओवाद्यांच्या भुसुरुंग स्फोटात जवानांसह ट्रक 20 फूट दूर फेकला गेला...

रस्त्यावर पडलेला हा दहा फुटांचा खड्डा आणि स्फोटानंतर जवळपास वीस फुटांवर उडून पडलेलं हे चिलखती वाहनं...माओवाद्यांनी किती मोठा स्फोट घडवला असेल हे या वाहनाच्या स्थितीवरुन लक्षात येतं.

Sachin Salve | Updated On: May 4, 2017 09:27 PM IST

ग्राऊंड रिपोर्ट : माओवाद्यांच्या भुसुरुंग स्फोटात जवानांसह ट्रक 20 फूट दूर फेकला गेला...

महेश तिवारी,गडचिरोली

04 मे : गडचिरोली पोलीस दलाच्या बहादूर जवानांमुळे माओवाद्यांच्या सापळ्यातून 21 जवान बचावलेत. पण माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पोलिसांना माओवादीविरोधी अभियानाची रणनिती बदलण्याची गरज निर्माण झालीये.

गडचिरोली जिल्ह्यातल्या कियर गावाजवळ माओवाद्यांनी उडवलेलं हे पोलिसांचं भूसुरुंगविरोधी वाहन पाहा...रस्त्यावर पडलेला हा दहा फुटांचा खड्डा आणि स्फोटानंतर जवळपास वीस फुटांवर उडून पडलेलं हे चिलखती वाहनं...माओवाद्यांनी किती मोठा स्फोट घडवला असेल हे या वाहनाच्या स्थितीवरुन लक्षात येतं.

कोणत्याही साध्या स्फोटाला दाद न देणाऱ्या वीस टनाच्या चिलखती गाडीची ही अशी अवस्था झालीये. भामरागड तालुक्यातल्या कोपर्चीतली चकमक संपवून पोलीस दलाचे सी-60 कमांडोच्या दोन चिलखती गाड्या भामरागडकडे निघाल्या होत्या.

या गाड्या हेमलकसापासून 5 किलोमीटरवरील कियर गावाजवळ आल्या असता माओवाद्यांनी रस्त्यावर पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट घडवला. यात चिलखती ट्रक वीस फूट अंतरावर फेकला गेला. त्यानंतर लपून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या वाहनातल्या कमांडोनी मागे फिरुन माओवाद्यांवर जोरदार प्रतिहल्ला केला.

माओवाद्यांनी पोलिसांसाठी सापळा रचला होता. पण सुदैवानं आणि पोलिसांनी दाखवलेल्या बहादुरीमुळे माओवाद्यांना घटनास्थळावरुन पळ काढावा लागला. माओवादी चिलखती गाड्यांनाही लक्ष करीत असल्यानं पोलिसांना आता माओवाद्यांविरोधात वेगळी रणनिती अवलंबावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 09:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close