महाराष्ट्रादिनीच माओवाद्यांकडून जळीतकांड, 5 कोटींपेक्षा जास्त मालमत्तेचं नुकसान

माओवाद्यांनी तब्बल 30 वाहने जाळली असून यामुळे 5 कोटींपेक्षा जास्त रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 09:48 AM IST

महाराष्ट्रादिनीच माओवाद्यांकडून जळीतकांड, 5 कोटींपेक्षा जास्त मालमत्तेचं नुकसान

महेश तिवारी, गडचिरोली, 1 मे : लोकसभा निवडणुकीसाठीचं महाराष्ट्रातील मतदान संपल्यानंतर माओवाद्यांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे. माओवाद्यांनी तब्बल 30 वाहने जाळली असून यामुळे 5 कोटींपेक्षा जास्त रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे.

कुरखेडा तालुक्यातील दानापूर इथं ही घटना घडली आहे. माओवाद्यांनी रात्री 11 ते 3 वाजताच्या सुमारास हे जळीतकांड घडवून आणलं आहे. पुराडा पोलीस स्थानकाअंतर्गत येत असलेल्या दादापूर येथून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होतं.

या कामावरील ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर यांसह 30 पेक्षा जास्त वाहनं जाळण्यात आली आहेत. तसंच दादापूर येथील डांबर प्लांट, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालयही माओवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आलं.

या सगळ्या जळीतकांडात एकूण पाच कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती आहे. माओवाद्यांनी केलेल्या या कृत्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याआधीही माओवाद्यांनी रस्ते तयार करणाऱ्या वाहनांना लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आगामी काळात अशी विकासकाम करताना माओवाद्यांकडून होणाऱ्या हिंसक प्रकारांना कसं रोखायचं, हे आव्हान प्रशासनासमोर तयार झालं आहे.

Loading...


मराठवाडा आणि विदर्भातील पाण्याचं भीषण वास्तव दाखवणारा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 09:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...