S M L

एक कोटीचं बक्षीस असलेल्या या मओवाद्यानं केलं आत्मसमर्पण !

डचिरोलीसह तीन राज्यात सक्रीय असलेला जहाल माओवादी पहाडसिंग याने आत्मसमर्पण केलंय. पहाडसिंगवर तीन राज्यात एक कोटी रुपयांच बक्षीस होतं.

Updated On: Aug 23, 2018 07:07 PM IST

एक कोटीचं बक्षीस असलेल्या या मओवाद्यानं केलं आत्मसमर्पण !

गडचिरोली, 23 ऑगस्ट : गडचिरोलीसह तीन राज्यात सक्रीय असलेला जहाल माओवादी पहाडसिंग याने आत्मसमर्पण केलंय. पहाडसिंगवर तीन राज्यात एक कोटी रुपयांच बक्षीस होतं. 2003 मध्ये माओवादी चळवळीत दाखल झालेला पहाडसिंग गडचिरोली, गोंदीया जिल्हयासह छत्तीसगड आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात सक्रिय होता. गडचिरोली जिल्हयात सीआरपीएफच्या तीन जवानांच्या हत्येसह अनेक हत्या, जाळपोळ आणि पोलीसावर हल्लयाचे चाळीसपेक्षा जास्त, तर तिन्ही राज्यात 80 गुन्हे दाखल आहेत. छत्तीसगडच्या दुर्ग पोलीसासमोर पहाडसिंगनं गुरुवारी आत्मसमर्पण केलंय.

एप्रिलमध्ये 40 माओवाद्यांचा खात्मा केल्यानंतर, इतर महत्त्वाच्या माओवाद्यांना अटक करण्यासाठी तपासयंत्रणांनी कंबर कसली होती. दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरातील जहाल माओवाद्यांची माहिती देणाऱ्याला सरकारनं लाखो रूपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. आरोपीला पकडण्यासाठी पत्रके लावली जातात, बातम्यांमधून आवाहन केलं जातं असं आजवरच चित्र आहे. पण गडचिरोली जिल्हयात-पोलिसांनी जहाल माओवाद्यांना पकडण्यासाठी वृत्तपत्रात चक्क पानभर जाहिराती दिल्या होती. पहाडसिंगसह सह्यांद्री, नर्मदाक्का, वेणुगोपाल आणि जोगन्ना या जहाल माओवाद्यांची माहिती द्या आणि लखपती व्हा, अशा पानभर जाहिरातीसह ठिकठिकाणी फलकेदेखील लावण्यात आले होती. या ५ माओवाद्यांची माहिती देणाऱ्यास १ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. ५ जहाल माओवाद्यांपैकी छत्तीसगढ मधील राजनांदगाव - फाफामार येथे राहणारा पहाडसिंग उर्फ अशोक उर्फ टिपु सुलतान उर्फ कुमारसाय कतलामी उर्फ बाबुराव तोफा याने आज आत्मसमर्पण केलंय.

भुपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल पद माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेला पोलीस ब्युरोचा सदस्य तसंच रिजनल समितीचा सचिव असुन दंडकारण्यासह मुंबई, सुरत या भागातल माओवादी चळवळीच शहरी नेटवर्क मजबुत करायची जबाबदारी आहे भुपतीवर आहे. चार राज्यात त्याच्यावर एक कोटीच बक्षीस आहे. उषाराणी उर्फ नर्मदक्का माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीची शिकलेली बुध्दीवान सदस्य आहे. नर्मदक्का नावाने दंडकारण्यात वावर असलेल्या नर्मदक्काकडे पश्चिमी मिलीट्री कमांडची जबाबदारी असून, गडचिरोली जिल्हयातल्या चळवळीचं नेतृत्व असलेल्या नर्मदक्कावरही सत्तर लाखापेक्षा जास्त बक्षीस आहे. या दोन महत्वपर्ण नेत्यासह पहाडसिंग, सह्याद्री उर्फ मिलींद तेलतुंबडे आणि जोगन्ना या पाच माओवादी नेत्यांवर चळवळ मजबुत करण्याची जबाबदारी आहे.

देशातील सर्वात मोठ माओवादविरोधी ऑपरेशन एप्रिल 2018 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात राबवले गेले होते आणि त्यात तब्बल 40 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. गेल्या ३६ वर्षांत माओवाद्यांना हा सर्वात मोठा धक्का होता. माओवादी चळवळ परत जोर पकडता कामा नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या पाचही जहाल माओवाद्यांसह छत्तीसगढ मधील राजनांदगाव - फाफामार येथे राहणाऱ्या पहाडसिंग उर्फ अशोक उर्फ टिपु सुलतान उर्फ कुमारसाय कतलामी उर्फ बाबुराव तोफा यांच्यावर १ कोटी ७० लाखांचे बक्षिस ठेवण्यात आलं होतं. या जहाल मओवाद्यांची माहीती देणाऱ्याला 'लाखो रुपये कमवा' असं आवाहन देखील पोलीसांनी केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 06:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close