S M L

कर्जमाफीच्या प्रक्रियेत अक्षम्य घोडचुका;183 जणांचा एकच आधार क्रमांक

एका केसमध्ये १८३ लाभार्थींच्या नावापुढं एकच आधार क्रमांक लिहिलाय. तर कुठे २ ते ३ लाभार्थींचा खातं क्रमांक एकच दाखवणे

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 26, 2017 10:17 AM IST

कर्जमाफीच्या प्रक्रियेत अक्षम्य घोडचुका;183 जणांचा एकच आधार क्रमांक

26 ऑक्टोबर: कर्जमाफी प्रक्रियेत अनेक घोळ झाले आहेत.या प्रक्रियेत झालेल्या चुकांचा पाढा मोठा आहे.अत्यंत छोट्या छोट्या चुका करण्यात आल्या आहेत. या चुकांवर हसावं की रडावं तेच कळत नाही.

एका केसमध्ये १८३ लाभार्थींच्या नावापुढं एकच आधार क्रमांक लिहिलाय. तर कुठे २ ते ३ लाभार्थींचा खातं क्रमांक एकच दाखवणे. मनात येईल तो आधार क्रमांक टाकणे. म्हणजे डेटा एंट्री करणाऱ्याला वाटलं की ४० जणांचा आधार क्रमांक आपण एक आणि त्यापुढे अकरा शून्य टाकू, आणि त्यानं टाकलाही. कर्जमाफी सुरू आहे की खेळ चाललाय, हा प्रश्न पडतो. या सर्व चुकांचं वैशिष्ट्य असं की या अनावधानानं झालेल्या चुका वाटत नाहीत. लाभार्थींची माहिती कॉम्प्युटरमध्ये भरण्यासाठी वेळ कमी लागावा म्हणून केलेल्या या चुका आहेत, जाणूनबुजून केल्या आहेत. आता हे बँक कर्मचाऱ्यांकडून झालंय, की चंद्रकांत पाटलांच्या म्हणण्याप्रमाणं खासगी कंपन्यांकडून झाले आहे ते कळायला मार्ग नाही.

पण याबाबतीत आता राज्य सरकार काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 10:17 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close