शेतकरी संप सुरू ठेवण्याचा काही संघटनांचा निर्धार

मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला असला तरीही राज्यातल्या शेतकऱ्यांना मात्र हा निर्णय मान्य नाहीये.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2017 01:04 PM IST

शेतकरी संप सुरू ठेवण्याचा काही संघटनांचा निर्धार

03 जून : मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला असला तरीही राज्यातल्या शेतकऱ्यांना मात्र हा निर्णय मान्य नाहीये. नाशिक जिल्ह्यात या निर्णयाविरोधात पडसाद उमटले. जिल्ह्यातील 19 बाजार समित्या आजही बंदच ठेवण्यात आल्यात. या निर्णयाच्या विरोधात बाजार समितीच्या गेटवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. नाशिकमधील शेतकरी याबाबत आपला निर्णय जाहीर करणारेत.

दुसरीकडे हा संप पुकारण्याचा निर्णय ज्या पुणतांबा गावातील ग्रामसभेत घेण्यात आला तिथेही या निर्णयाबाबत मोठी नाराजी आहे. सरकारशी चर्चा झाल्यानंतर ग्रामसभेपुढे येऊन तो निर्णय जाहीर करायला हवा होता, मात्र हा निर्णय परस्पर जाहीर करण्यात आला. त्यामुळे संभ्रम वाढल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तूर्तास तरी संप मागे घेण्याचा कोणताही विचार नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.

किसान क्रांती मोर्चातर्फे मनमाड बाजार समिती जवळ निषेध आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी आमची फसवणूक केली असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार किसान क्रांती मोर्चाने केला आहे.

नांदेडमध्येही शेतक-यांनी संप कायम ठेवलाय. मुख्यमंत्र्यानी केवळ गाजर दाखवला , थेट निर्णय घेतला नाही असा आरोप करत शेतकरी रस्त्यावर उतरले.नांदेडमधल्या शेतक-यांनी आपल्या शेतातील माल रस्त्यावर आणुन टाकला . सरसकट  कर्जमाफी अर्थात सातबारा कोरा करावा आणि हमीभाव दिल्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी शेतक-यांची मागणी आहे.

Loading...

तर सांगलीमध्ये  मुख्यमंत्री आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचं दहन केलं.

येवला तालुक्यातील सायगावमधील शेतकरी संपावर ठाम आहेत. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला जोपर्यंत संपूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलाय. उद्या सायगावचा आठवडे बाजार बंदची घोषणा केलीय. तर  भारम येथील आजचा आठवडे बाजार कडकडीत बंद   आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2017 01:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...