सावधान !, 'हा' बर्फ तुमच्या तब्येतीचे बारा वाजवू शकतो

उन्हाळ्यात आईस गोळा, कोल्ड्रिंक्स,रसवंती आणि ज्यूस सेंटर्सवर प्रचंड गर्दी होते.पण हे ऐकून धक्का बसेल की यात वापरला जाणारा बहुतांश बर्फ हा खाण्याजोगा नसतो

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 6, 2017 10:18 PM IST

सावधान !, 'हा' बर्फ तुमच्या तब्येतीचे बारा वाजवू शकतो

सुरभी शिरपुरकर,नागपूर

06 मे : उन्हाळ्यात आईस गोळा, कोल्ड्रिंक्स,रसवंती आणि ज्यूस सेंटर्सवर प्रचंड गर्दी होते.पण हे ऐकून धक्का बसेल की यात वापरला जाणारा बहुतांश बर्फ हा खाण्याजोगा नसतो. तो अमोनिया वायू, दूषित पाण्याद्वारे तयार करण्यात येत असल्याचं समोर आलंय. कमीत कमी भांडवलात भरपूर नफा कमवायच्या मोहात व्यापाऱ्यांनी अक्षरश: नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ मांडलाय ते सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट...

कडक उन्हाळा आहे आणि साहजिकच पावलं थंडगार काहीतरी खाण्यापिण्यासाठी वळतात...पण सावधान...!आपण जे थंडगार पदार्थ खातो, त्यासाठी वारपलं जाणारं बर्फ आरोग्याला हानिकारक असल्याचं आढळलंय. नागपूरमध्ये बर्फ बनवणाऱ्या सात कंपन्या आहेत. त्यापैकी दोनच कंपन्या खाण्यासाठी वापरला जाणारा बर्फ बनवतात. ज्याचा पुरवठा महागड्या हॉटेल्स आणि बिअरबारमध्ये होतो. राहिलेल्या कंपन्यांचा खाण्यायोग्य नसलेला बर्फ ग्राहकांच्या माथी मारला जातो.

बर्फ बनविण्यापासून त्याच्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात. तो मोठ्या आकाराच व्हावा यासाठी अमोनिया वायूचा वापर केला जातो. बर्फाच्या लाद्या तयार करण्यासाठी जे साचे वापरले जातात ते जास्ताचा थर दिलेले म्हणजेच गॅल्व्हनाईज्ड असणं गरजेचं असतं. पण त्याची किंमत जास्त असल्यानं स्वस्त:ले पत्र्याचे वापरले जातात. पत्रा गंजतो आणि तो गंज बर्फाच्या पाण्यात मिसळू लागतो. हे आरोग्याच्या दृष्टीनं हे हानिकारक आहे.

उन्हाळा सुरू होताच अन्न आणि औषध प्रशासनाने बर्फ तयार करणाऱ्या कंपन्यांना भेटी देऊन या सगळ्या बाबींची पाहणी करण्याची आणि लोकांचे आरोग्य वाचवण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2017 10:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...