रिक्षात बॅग सोडून 'ते' पळाले, बॅग उघडली आढळला पुरुषाचा मृतदेह

रिक्षात बॅग सोडून 'ते' पळाले, बॅग उघडली आढळला पुरुषाचा मृतदेह

नागपूरच्या प्रताप नगरात परिसरातील माटे चौकात मध्यरात्री एका मृतदेह असलेली बॅग आॅटोरिक्षामध्ये एक तरुण तरुणी सोडून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:

16 आॅक्टोबर : नागपूरच्या प्रताप नगरात परिसरातील माटे चौकात मध्यरात्री एका मृतदेह असलेली बॅगेत आॅटोरिक्षामध्ये एक तरुण तरुणी सोडून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

हे तरुण तरुणी कोण आहेत आणि खून झालेली व्यक्ती कोण आहे याचा तपास नागपूरचे राणाप्रताप नगर पोलीस करताहेत.

प्रताप नगर परिसरात दुर्गा स्टँडवरून काल मध्यरात्री या तरुण-तरुणींनी रिक्षा पकडली. त्यांनी रिक्षाचालकाला रेल्वे स्टेशनकडे जाण्याचं सांगितलं. पण तरुण-तरुणीचं बॅगसह  आॅटोरिक्षा चालकाला ह्याचं वर्तन संशयास्पद वाटलं.  त्यांने या दोघांना विचारणा केली. पण त्यांनी उडावाउडवीची उत्तर दिली. थोड्याच वेळात आॅटोरिक्षा चालकाला हा प्रकार लक्षात आल्याने या दोघांनीही रिक्षातच बॅग सोडून पोबारा केला.

रिक्षाचालकाने तात्काळ याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बॅग उघडून पाहिली असता यात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला.

आता या प्रकरणात आॅटोरिक्षा चालकाच्या माहितीवरून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2017 10:07 AM IST

ताज्या बातम्या