S M L

... तर वाजपेयी, मनमोहन सिंह, प्रणव मुुखर्जी बेघर होणार?

तर झालंय असं अखिलेश यादव यांच्या आधी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांना निवासस्थान मिळणार की नाही याबद्दल एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 7, 2018 08:48 PM IST

... तर वाजपेयी, मनमोहन सिंह, प्रणव मुुखर्जी बेघर होणार?

07 जानेवारी :   भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी , मनमोहन सिंह  आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे बेघर होण्याची शक्यता आहे.  माजी लोकप्रतिनिधींना  मिळणाऱ्या शासकीय निवासस्थानांवर एक निर्णय लवकरच सुप्रीम कोर्ट देणार आहे. या निर्णयावर या माजी लोकप्रतिनिधींकडे  शासकीय निवासस्थानांचा ताबा राहिल की नाही हे ठरणार आहे.

तर झालंय असं अखिलेश यादव यांच्या आधी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांना  निवासस्थान मिळणार की नाही याबद्दल  एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. लोक प्रहरी या संस्थेने ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना  न्यायमुर्ती रंजन गोगोई  आणि न्यायमुर्ती नवीन सिन्हा यांच्या खंडपीठाने न्यायमित्र म्हणून  गोपी सुब्रम्ह्ण्यम   यांची न्यायमित्र म्हणून  नियुक्ती करण्यात आली. त्यांना  याप्रकरणी सर्व शासकीय निवासस्थांनासंदर्भात रिपोर्ट देण्यास सांगितलं  आहे.   या रिपोर्टवर आता  16 जानेवारीवला सुनावणी होणार आहे.

निवृत्त लोकप्रतिनिधींना सामान्य माणासांहून अधिक सुविधा मिळू नये तसंच माजी पंतप्रधानांच्या मृत्यू नंतर त्यांची घरं ही   संग्रहालय होऊ नयेत अशा मागण्या या रिपोर्टमध्ये करण्यात आल्या आहेत. आता यावर जो निर्णय देण्यात येईल त्यानुसार यांची घरं यांच्याकडे राहतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2018 05:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close