सुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके!

महाराष्ट्रातला शेतकरी सध्या दुष्काळाचे चटके सहन करतोय. त्याच दुष्काळाचे चटके देशासाठी गोल्डमेडल मिळणारा चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथला दत्तू भोकनळलाही बसताहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2018 10:35 PM IST

सुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके!

बब्बू शेख, मनमाड, 15 ऑक्टोबर - महाराष्ट्रातला शेतकरी सध्या दुष्काळाचे चटके सहन करतोय. त्याच दुष्काळाचे चटके देशासाठी गोल्डमेडल मिळणारा चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथला दत्तू भोकनळलाही बसताहेत. मराठमोळा रोईंग पटू दत्तू भोकनाळ याने आशियाई खेळांमध्ये भल्याभल्यांना मागे सोडत सुवर्णपदकाला गवसणी घालत तिरंग्याची शान वाढवली होती. मात्र, चांदवड तालुक्यातही दुष्काळाचे सावट असल्याने सुवर्णपदक विजेत्या या खेळाडूलाही दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागताहेत.

पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या स्वप्नांची झालेली राखरांगोळी म्हणजे दुष्काळाचा दशावतारच म्हणावा लागेल. मक्याच्या पिकासोबत जळालेल्या स्वप्नांमधून काडी-काडी जमवण्याचा आणि दुष्काळाशी दोन हात करण्याचा केविलवाणा प्रयत्न दत्तू भोकनळ करताहेत. काळ्या मातीत राबणारे हे हात साधेसुधे नाहीत. ज्या हातांनी आशियाई खेळांमध्ये भल्याभल्यांना मागे सोडत सुवर्णपदकाला गवसणी घातली, ज्या हातांनी तिरंग्याची शान वाढवली, त्या मराठमोळ्या रोईंग पटू दत्तू भोकनाळ या खेळाडूचे आहेत. देशासाठी सुर्वणपदकाची कमाई करून गावाकडे सुट्टीवर आलेल्या दत्तूला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागताहेत.

दत्तू आज जगासाठी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, सेलिब्रिटी आहे. पण वडील गेल्यानंतर घराची जबाबदारी खांद्यावर पडल्याने दत्तूची नाळ आजही मातीशी घट्ट जोडलेली आहे. माणसं यशोशिखरावर पोहोचली की पायथ्याला विसरून जातात, पण दत्तूसारखे यशवंत आभाळाला साद घालतानाही मातीत घट्ट पाय रोवून उभे आहेत. देशासाठी गोल्ड मेडल मिळवणाऱ्या दत्तूचं कौतुक करावं, की दुष्काळाचे चटके सहन करावे लागताहेत त्याबद्दल खेद व्यक्त करावा? असा प्रश्न आता निर्माण झालाय.

महिन्याभराच्या सुटीवर मी गावी आलोय. मोठा भाऊ म्हणाला की, मका काढण्यासाठी मजूर लाऊ. पण, स्वतःच्या शेतात राबण्याचं भाग्य सर्वांना मिळत नाही. मजूर लावण्याएवजी आपण स्वतःच राबायला मला आवडतं. आपल्या शेतात काम करायला काय लाज वाटून घ्यायची. माझ्या मातीशी माझी नाळ घट्ट जुळलेली आहे. आशियाई खेळ आत्ता आत्ता सुरू झाले आहेत, आणि मी त्यात सुवर्णपदक मिळवलंय. पण त्याआधी मी या गावातच राहिलोय आणि मका सोगण्याचंच काम केलंय हे विसरून कसं चालेल. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. यंदा कांदा आणि मक्याला लावलेला खर्चही निघेल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे शासनाला एकच विनंती आहे की, तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला असल्याने पुढली प्रक्रियेवर झपाट्याने काम केल्यास सर्वच शेतकऱ्यांना आनंद होईल अशी प्रतिक्रिया सुवर्णपद विजेता दत्तू भोकनाळ याने न्यूज18 लोकमतला दिली.

 एक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2018 10:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...