आवक घटल्याने कांद्याच्या भावात तेजी; कांदा उत्पादक खुश!

आवक घटल्याने कांद्याच्या भावात तेजी; कांदा उत्पादक खुश!

गेल्या महिन्यात कांद्याला सरासरी 650 रुपये प्रति क्विंटल भाव होता, तो आज प्रति क्विंटल 1750 रुपये भाव आहे.

  • Share this:

बब्बू शेख, मनमाड, 16 ऑक्टोबर : गेल्या महिन्यात कांद्याला सरासरी 650 रुपये प्रति क्विंटल भाव होता, तो आज प्रति क्विंटल 1750 रुपये भाव आहे. क्विंटल मागे 1100 रुपयांची वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही महिन्यापासून कोसळणाऱ्या कांद्याचा भावाला ब्रेक लागला आहे. सध्या लासलगाव, मनमाड यासह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या सरासरी भावात क्विंटल मागे 1000 ते 1100 रुपयांची वाढ झाली आहे. भावात सुधारणा झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, ही भाव वाढ नसून भावात सुधारणा झाली असल्याचे अशोक बढे आणि संतोष सानप या शेतकऱ्यांनी न्यूज18 लोकमतला सांगितले.

मे महिन्यात उन्हाळी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात आलं होतं, त्यामुळे भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. कष्टाने पिकविलेला कांदा मातीमोल भावाने विकण्या एवजी पुढे भाव वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र मधल्या 4-5 महिन्यांत भाववाढ न झाल्याने साठवणुकीतला 50 टक्के कांदा सडला. यंदा पावसाने दगा दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका जवळपास सर्वच पिकांना बसलाय. त्यातच कांद्याची आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती उदभवल्याने कांद्याच्या भावात सुधारणा झाली असल्याचे मनमाडचे कांदा व्यापारी रुपेश ललवाणी यांनी न्यूज18 लोकमतला सांगितले.

मुंबई, ठाणे आणि उपनगरांतील बाजारपेठांमध्ये कांद्यात किलोमागे १० रुपयांची वाढ झालीय, तर मनमाडमध्ये महिन्याभरापूर्वी 650 रुपये प्रति क्विंटल भाव असलेला कांदा 1750 वर पोहोचल्यामुळे कांदा उत्पादक खुश आहेत.

 मॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2018 08:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...