S M L

मनमाडमध्ये डाॅक्टराला मारहाण, जिल्ह्याभरात डाॅक्टरांचा संप

रूग्णाला अॅडमिट करून घेतलं नाही म्हणून संतापलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला आणि नर्सला मारहाण केलीये. मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात घटना घडलीये.

Sachin Salve | Updated On: May 8, 2017 06:51 PM IST

मनमाडमध्ये डाॅक्टराला मारहाण, जिल्ह्याभरात डाॅक्टरांचा संप

08 मे : मनमाडमध्ये पुन्हा एकदा डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. रूग्णाला अॅडमिट करून घेतलं नाही म्हणून संतापलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला आणि नर्सला मारहाण केलीये. मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात घटना घडलीये.

या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांच्या मॅग्मो संघटनेनं आज संप पुकारलाय. तर मनमाडसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात याचे पडसाद उमटले असून शासकीय हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे.

दरम्यान, डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याप्रकरणी मनमाड पोलिसांनी 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुमताज शेख या महिलेला जुलाब होत होते तिच्यावर डॉक्टरांनी उपचारही केले पण मुमताजला रूग्णालयात दाखल करून घ्या असा अट्टाहास नातेवाईकांचा होता. मुमताजला दाखल करून घेण्याची गरज नाहीये असं सांगिल्यावर आम्हाला मारहाण केली असा आरोप डॉक्टरांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2017 06:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close