औरंगाबादमध्ये माणिक हाॅस्पिटलला लागलेली आग आटोक्यात

औरंगाबादमध्ये माणिक हाॅस्पिटलला लागलेली आग आटोक्यात

सुदैवाची बाब म्हणजे सर्व ७५ रुग्ण सुरक्षित आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 02 एप्रिल : शहरातील माणिक सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाला भीषण आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या दुर्घटनेत सर्व रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

औरंगाबादमधल्या गारखेडा परिसरातील माणिक माणिक सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाला आज दुपारी आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवाची बाब म्हणजे सर्व ७५ रुग्ण सुरक्षित आहेत.

या आगीमुळे पहिल्या मजल्यावरील रुग्णांना झोळी करून खाली उतरवण्यात आले आणि माणिक हॉस्पिटलमधील रुग्ण जवळील हेडगेवार हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. यातील काही रुग्णांना आता घाटी रुग्णालय आणि इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलंय. माणिक रुग्णालय आता संपूर्णपणे रिकामं करण्यात आलंय. या रुग्णालयाला कशामुळे आग लागली होती हे मात्र अद्याप कळू शकलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2018 01:47 PM IST

ताज्या बातम्या