S M L

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांना अखेरचा निरोप

आज दुपारी एक वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

Sonali Deshpande | Updated On: Jul 11, 2017 03:21 PM IST

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांना अखेरचा निरोप

11 जुलै: आपल्या व्यंगचित्रांनी गेली 6 दशक लोकांचं रंजन आणि प्रबोधन करणाऱ्या व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर( 78) यांचं सोमवारी रात्री उशिरा निधन झालंय. पुण्यात रूबी हॉल रूग्णालयात  त्यांचं निधन झालंय.ते रविवारपासून रूग्णालयात भरती होते.  आज दुपारी एक वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

तेंडुलकरांनी व्यंगचित्रांसोबतच ललित लेखनही बरंच केलं होतं. त्यांच्या व्यंगचित्रांची प्रदर्शनं पुण्यात भरत असतं. असं शेवटचं प्रदर्शन जून महिन्यातच भरलं होतं. त्यांनी लिहिलेली संडे मुड, भुईचक्रसारखी पुस्तकं भरपूर गाजली. संडे मुडला तर वि.मा.दी पटवर्धन पुरस्कारही मिळाला. आयुष्याचा अखेरच्या काळापर्यंत ते कार्यरत होते.

त्यांच्या निधनाने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2017 08:32 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close