पठ्ठ्याने इंडिगोच्या इंदूर गोवा फ्लाईटमध्ये मैत्रिणीला केलं प्रपोज, आणि ती म्हणाली...!

तुम्ही अनेक सिनेमांत विमानामध्ये प्रियकर आणि प्रेयसीचं गाणं पाहिलं असेल. पण गाणं सोड ओ, इंडिगोच्या इंदूर गोवा फ्लाईटमध्ये एका प्रवाशानं त्याच्या मैत्रिणीला थेट प्रपोज केलं.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 23, 2018 09:16 AM IST

पठ्ठ्याने इंडिगोच्या इंदूर गोवा फ्लाईटमध्ये मैत्रिणीला केलं प्रपोज, आणि ती म्हणाली...!

मुंबई, 23 मे : तुम्ही अनेक सिनेमांत विमानामध्ये प्रियकर आणि प्रेयसीचं गाणं पाहिलं असेल. पण गाणं सोड ओ, इंडिगोच्या इंदूर गोवा फ्लाईटमध्ये एका प्रवाशानं त्याच्या मैत्रिणीला थेट प्रपोज केलं. आणि विमान उडण्याच्या आत हा कार्यक्रम पारही पडला. काय बरं म्हणाली असेल ती मुलगी?

मंडळी, विशेष म्हणजे प्लेनच्या स्पीकर सिस्टमवरून त्यानं मुलीला मागणी घातली. या सगळ्या सुंदर क्षणांसाठी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी त्याला मदत केली. ते विमानाच्या दारात, विल यु मॅरी मी, असे पोस्टर घेऊन उभे होते. किती छान ना ! खरं तर प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिच्या राजकुमारने तिला असंच शाही पद्धतीने प्रपोज करावं.

आता प्रश्न हा होता की मुलगी काय उत्तर देणार. हो म्हणणार की प्रस्ताव नाकारणार. तो सिन असा होता की, हे सगळं पाहून तर ती आधी खूप खुश झाली. ती पुढे आली. अगदी सिनेमासारखं प्रवाशांमध्येही थोडीशी धाकधूक होती, पण शेवटी मुलगी 'हो' म्हणाली, आणि या प्रपोज सोहळ्याचा शेवट गोड झाला. या दोघांच्या या प्रेमाच्या गोष्टीला सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2018 09:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...