माणूस की जनावर ?, मुक्या जिवाला झाडाला बांधून जीवे मारलं

माणूस की जनावर ?, मुक्या जिवाला झाडाला बांधून जीवे मारलं

  • Share this:

16 डिसेंबर : एखाद्या मुक्या जखमी जनावराला एरव्ही माणूस उपचारासाठी समोर येत असतो. मात्र माणुसकीला काळीमा फासणारी घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. एका जखमी वानराला लाठीकाठीने बेदम मारहाण करून जीवे मारले.

वाशिमच्या रिसोड इथं ही धक्कादायक घटना घडलीये. पवन कडुजी बांगर असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने आणि त्याच्या मित्राने एका वानरा पकडले. आधी पवनने या वानराला काठीने बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीत हे वानर अर्धमेलं झालं.

वानर अर्धमेल झाल्यानंतरही या पवन थांबला नाही. त्याने अर्धमेल झालेल्या या वानराला झाडावर उलटे टांगले आणि पुन्हा मारहाण केली. या मारहाणीमध्ये वानराने आपला जीव सोडला. अंगाच थरकाप उडवणार हा सगळा प्रकार पवननेच आपल्या मित्राला मोबाईलमध्ये रेकाॅर्ड करायला सांगितला.

नंतर हा व्हिडिओ वेगवेगळ्या व्हाॅटस्अॅप ग्रुपवर शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

पोलीस या व्हिडिओची सत्यता तपासून पुढील कारवाई करणार असल्याचं कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2017 06:55 PM IST

ताज्या बातम्या