S M L

प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पतीनं केली पत्नी,मुलाची हत्या

आई आणि तिच्या 9 महिन्यांच्या मुलाच्या दुहेरी हत्याकांडाने पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली. पण पोलिसांनी काही तासातच प्रकरणाचा छडा लावला.

Sonali Deshpande | Updated On: Jun 10, 2018 06:21 PM IST

प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पतीनं केली पत्नी,मुलाची हत्या

चिंचवड, 10 जून : आई आणि तिच्या  9 महिन्यांच्या मुलाच्या दुहेरी हत्याकांडाने पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली. पण पोलिसांनी काही तासातच प्रकरणाचा छडा लावला. या महिलेच्या पतीनेचं म्हणजे दत्ता भोंडवेनेच दोघांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. दत्ता भोंडवे आणि त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन या हत्या घडवून आणल्या. हिंजवडी जवळच्या नेऱ्हे गावाशेजारी हा थरार घडला.

काही अज्ञात इसम लुटण्यासाठी आले आणि आपल्यावर आणि आपल्या पत्नी, मुलावर वार करून त्यांची हत्या केल्याची तक्रार दत्ता भोंडवेंनी केली होती. पोलिसांनी सगळ्या प्रकारे चौकशी केली, घटनास्थळाची पाहणी केली आणि भोडवेनं हा बनाव केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसी खाक्या दाखवताच भोंडवेने या हत्या प्रेयसीने केलेल्या कटानुसार घडवून आणल्याचं मान्य केलं. पोलिसांनी या प्रकरणी भोंडवे, त्याची प्रियसी आणि इतर दोघांना ताब्यात घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2018 06:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close