अंगावर धावून आल्याचा राग, पुण्यात माणसाने केली कुत्र्याची हत्या

कुत्रा माणसाला चावला म्हणून माणूस कुत्र्याला चावत नाही अशी म्हण आहे. मात्र पुण्यात अगदी विरूध्द घटना घडली. कुत्रा अंगावर धावून गेल्याचा राग आल्यानं कुत्र्याची हत्या केल्याची धक्कादाय घटना कात्रजमध्ये घडलीय.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2018 10:17 PM IST

अंगावर धावून आल्याचा राग, पुण्यात माणसाने केली कुत्र्याची हत्या

पुणे,15 मार्च : कुत्रा माणसाला चावला म्हणून माणूस कुत्र्याला चावत नाही अशी म्हण आहे. मात्र पुण्यात अगदी विरूध्द घटना घडली. कुत्रा अंगावर धावून गेल्याचा राग आल्यानं कुत्र्याची हत्या केल्याची धक्कादाय घटना कात्रजमध्ये घडलीय.

कात्रजच्या निंबाळकर वस्तीत सिंधू बेलसरे हे स्वामी समर्थांचा मठ चालवतात. या मठाच्या सुरक्षेसाठी त्यांनी कुत्रा पाळला होता. हा कुत्रा सुदर्शन चौगुले यांच्या मुलाच्या अंगावर धावून गेला त्याचा राग आल्याने त्यांनी कुत्र्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती आणि त्यानंतर रात्री कुत्रा मठाच्या जिन्यात मृतावस्थेत आढळला. त्याचा गळा कोयत्याने कापण्यात आला होता. बेलसरे यांनी याविरूध्द पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही. शेवटी आयुक्तांकडे दाद मागितल्यावर या प्रकरणाची दखल घेतली गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2018 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...