Elec-widget

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी.. पार्किंगच्या नावाखाली होणारी लूट थांबणार

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी.. पार्किंगच्या नावाखाली होणारी लूट थांबणार

नाशिककरांना आनंद देणारी बातमी आहे. पार्किंगच्या नावाखाली होणारी लूट थांबणार आहे. पुण्यापाठोपाठ आता नाशिकच्या मॉल्समध्येही पार्किंग मोफत करण्यात आली आहे.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, (प्रतिनिधी)

नाशिक, 26 जून- नाशिककरांना आनंद देणारी बातमी आहे. पार्किंगच्या नावाखाली होणारी लूट थांबणार आहे. पुण्यापाठोपाठ आता नाशिकच्या मॉल्समध्येही पार्किंग मोफत करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या महासभेत विनाशुल्क पार्किंगच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांपाठोपाठ नाशिककरांचीही मॉल्समधील पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेली लूट थांबणार आहे.

पुण्यात मॉल्समधील पार्किंग मोफत करण्याचा निर्णय झाल्यानंतर नाशिकमधील लोकप्रतिनिधींनीही नाशिक शहरातील पार्किंग मोफत करण्याचा मुद्दा लावून धरला होता. सिडको परिसरातील शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी हा प्रस्ताव गेल्या महासभेत मांडला होता. त्यांच्या प्रस्तवाला शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत सभागृहात आंदोलन केले होते. मात्र, गेल्या आठवड्यात महासभा तहकूब झाल्याने सदर विषय लांबणीवर पडला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या महासभेत महापौरानी शहरातील सर्व मॉल्सना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

महापौर रंजना भानसी यांनी सदर प्रस्ताव मंजूर केल्याने शिवसेना मगरसेविका किरण गामने आणि दीपक दातिर यांनी ही त्यांचे आभार मानले. एवढे दिवस मॉल्स चालकांकडून पार्किंगच्या नावाखाली जी लूट करण्यात आली तो पैसा महापालिकेच्या तिजोरीत कसा जमा होईल, यासाठी देखील प्रयत्न करणार नसल्याचे रंजना भानसी यांनी सांगितले. शहरातील सर्व मॉल्सना नोटीस बजावण्याचे आदेश महापौरांनी दिल्याने नाशिककरही चांगलेच खुश झाले आहेत. त्यांनीही पालिकेतील लोकप्रतिनिधींच्या या निर्णयाचे स्वागत केले असल्याचे किरण गामने आणि दीपक दातिर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, महासभेच्या निर्णयानंतर प्रशासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या नोटिसांना मॉल्स धारकांनी सकारत्मक प्रतिसाद न दिल्यास शहरातील मोफत पार्किंगचा मुद्दा चिघळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आता नाशिककरांना मॉल्समधील निशुल्क पार्किंगचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळतो, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...

VIDEO: औरंगाबादमध्ये विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा अर्धनग्न मोर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nashik
First Published: Jun 26, 2019 05:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...